---Advertisement---

डेव्हिड भाऊ जोरात! वॉर्नरने आता थेट अक्षय कुमारची केली नक्कल; म्हणाला, ‘सर्वात भारी कोणी केलंय?’

---Advertisement---

ऑस्ट्रेलिया संघाचा विस्फोटक सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरला बॉलिवूड आणि टॉलिवूडचे खूप आकर्षण आहे आणि हे कधीच कोणापासून लपून राहिले नाही. वॉर्नर नेहमी भारतीय चित्रपटासंदर्भातील व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतो. नुकताच त्याने अक्षय कुमारच्या स्टाईलमध्ये एक फोटो शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

ऑस्ट्रेलिया संघाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने सोमवारी (१२ जुलै) आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारचा एक फोटो पोस्ट केला आहे. तसेच त्याच्याबरोबर त्याने स्वत:चाही फोटो पोस्ट केला आहे. हे दोन फोटो कोलाज केलेले आहेत.

या कोलाज फोटोमध्ये वॉर्नर आणि अक्षय कुमार सारख्याच स्टाईलमध्ये उभामध्ये दिसून येत आहे. वॉर्नरने चित्रपट ‘हेरा फेरी ‘ च्या एक आयकॉनिक सीन पुन्हा एकदा रीक्रिएट केला गेला आहे. स्वत:चा आणि अक्षयचा फोटो पोस्ट करताना डेव्हिड वॉर्नरने त्याच्या चाहत्यांना विचारले आहे की, ‘कोणी ही पोझ सर्वात चांगली दिले आहे?.’ या पोस्टवर अनेक चाहत्यांने वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CRQ0mirLE6T/

अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानने यावर प्रतिक्रिया देत हसणारा इमोजी पोस्ट करून वॉर्नरची चेष्टा केली आहे. आयपीएलमध्ये वॉर्नर आणि राशिद हे दोघेही सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळतात.

यापूर्वी आयपीएल 2021 ला स्थगिती मिळाल्यानंतर ऑस्ट्रेलिया पोहचल्यानंतर वॉर्नरने एक अ‍ॅनिमेटेड फोटो शेअर केला होता ज्यात तो पत्नी कँडिस वॉर्नरने उचलून घेतले होते. डेव्हिड वॉर्नरने हा फोटो पोस्ट करत तेलुगू भाषेत कॅप्शन लिहिले होते की, ‘आय लव्ह यू.’ हा फोटो पाहून देखील चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या होत्या. यात कँडिसने हार्टची इमोजीदेखील पोस्ट केले आहे.

वॉर्नर नेहमीच सोशल मीडियावर विविध आणि गमतीशीर व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतो.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारत दुसऱ्यांदा करणार बॅडमिंटन चॅम्पियनशीपचे आयोजन, ‘या’ वर्षी पार पडणार ही मोठी स्पर्धा

ईशांत शर्माला गोल्फ खेळताना पाहून युवराज सिंगने घेतली त्याची फिरकी; म्हणाला, ‘लंबू जी, जरा…’

युरो चषक २०२१ च्या अंतिम सामन्यात अर्धनग्न चाहत्याचा धुमाकूळ, सुरक्षारक्षकांचा काढला घाम; व्हिडिओ व्हायरल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---