---Advertisement---

सीएसके पुजाराला पहिल्या काही सामन्यांसाठी अंतिम ११ जणांमध्ये स्थान देणार नाही, ‘या’ दिग्गजाचा दावा

On: गुरूवार, एप्रिल 8, 2021 9:51 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ९ एप्रिल पासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. सर्वच संघ विजेतेपद मिळवण्यासाठी कसून सराव करत आहे. ३ वेळेस आयपीएलचे जेतेपद पटकावणारा संघ चेन्नई सुपर किंग्ज संघ देखील मैदानावर घाम गाळत आहे. या संघात चेतेश्वर पुजाराला देखील यंदा संधी देण्यात आली आहे. पण त्याला सामन्यासाठी अंतिम ११ खेळाडूंमध्ये खेळण्याची संधी मिळणार की नाही याबाबत दिग्गज खेळाडूने भाष्य केले आहे.

चेतेश्वर पुजारा तब्बल ७ वर्षानंतर आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. त्याला आयपीएल खेळताना पाहून माजी भारतीय फिरकीपटू प्रज्ञान ओझा याला प्रचंड आनंद झाला आहे. परंतु त्याच्या मते, पूजाराला सुरुवातीच्या सामन्यांमध्ये अंतिम ११ खेळाडूंमध्ये संधी मिळणार नाही.

पुजराला चेन्नई सुपर किंग्ज संघाने ५० लाखांच्या किमतीत आपल्या संघात स्थान दिले आहे. स्पोर्ट्स टूडेला दिलेल्या मुलाखतीत प्रज्ञान ओझाला जेव्हा पुजाराबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने म्हटले की, “मी पुजाराला चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये पाहत नाही. तो ड्रेसिंग रूमचा एक भाग असेल परंतु त्याला अंतिम ११ खेळाडूंमध्ये खेळता येणार नाही. असे होऊ शकते की तो स्पर्धेच्यामध्ये संघात पुनरागमन करू शकतो, पण सुरुवातीला त्याला अंतिम ११ खेळाडूंमध्ये खेळण्याची संधी मिळणार नाही.”

पुजारा उत्कृष्ट फलंदाज आहे – ओझा

तसेच पुजाराचे कौतुक करताना प्रज्ञान ओझा म्हणाला,” पुजारा हा एक उत्तम फलंदाज आहे, तुम्ही ज्या स्वरूपात बोलाल, त्या स्वरूपात खेळण्यासाठी त्याच्याकडे कौशल्य व स्वभाव आहे. त्याच्याकडे क्षमता आहे आणि तो चांगली कामगिरी देखील करू शकतो. जेव्हा आपण टी२० क्रिकेटद्दल बोलतो तेव्हा ते कसोटीपासून वेगळे आहे. तुम्हाला खूप तंदुरुस्त राहावे लागते, मैदानावरील आव्हाने वेगळी आहेत. जे पुजारासाठी एक आव्हान असेल. याशिवाय मी पुजारासाठी खूप आनंदी आहे.”

महत्त्वाच्या बातम्या –

“त्याने जर चांगली कामगिरी केली असती, तर तो इतक्या संघाकडून खेळलाच नसता”

रोहितची पलटण करणार आयपीएल २०२१ चा श्रीगणेशा, आरसीबीविरुद्ध होणार पहिली लढत; पाहा मुंबईचे पूर्ण वेळापत्रक

कहर योगायोग! जन्मदिनाच्या तारखेएवढ्याच धावा कारकिर्दीत करणारा एकमेव खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---