---Advertisement---

“तो सूर्यकुमार यादवचा प्रो व्हर्जन आहे, त्याला सलामीला संधी मिळावी”

On: सोमवार, एप्रिल 12, 2021 10:48 AM
---Advertisement---

गतवर्षी कोरोना असल्यामुळे आयपीएल २०२० स्पर्धेचे आयोजन युएईमध्ये करण्यात आले होते. या आयपीएल हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. परंतु आयपीएल २०२१ च्या पहिल्याच सामन्यात त्याने ताबडतोड खेळी करून जोरदार पुनरागमन केले आहे. अशातच माजी भारतीय क्रिकेटपटू प्रज्ञान ओझाने त्याचे कौतुक करत त्याला एक सल्ला देखील दिला आहे.

कोलकाता नाईट रायडर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना १८७ धावा केल्या होत्या. या डावात नितीश राणाने सर्वाधिक ८० धावांची खेळी केली होती. तर दिनेश कार्तिक याने शेवटच्या षटकात येऊन २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने अवघ्या ९ चेंडूत २२ धावांची खेळी केली होती. या खेळीनंतर माजी भारतीय क्रिकेटपटू प्रज्ञान ओझाने त्याला सूर्यकुमार यादवचा ‘प्रो व्हर्जन’ असल्याचे म्हटले आहे.

त्याने मुलाखतीत म्हटले की, “मला वाटते की, दिनेश कार्तिकने सलामीला फलंदाजी करायला हवी. तो मुंबई इंडियन्स संघाच्या सूर्यकुमार यादवचा प्रो व्हर्जन आहे. जर तो सलामीला फलंदाजी करण्यासाठी आला तर त्याला जास्त वेळ फलंदाजी करण्याची संधी मिळेल. त्याच्याकडे विविधता आहे. मी त्याला लहानपणापासूनच खेळताना पाहत आलो आहे. जर सलामीला नाही येता आलं तर त्याने ३ किंवा ४ क्रमांकावर याव. त्याला सेट होण्यासाठी किमान ७ ते ८ चेंडू तरी हवेत.”

हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात कोलकाता संघाने २० षटक अखेर १८७ धावा केल्या होत्या. १८९ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या हैदराबाद संघाकडून जॉनी बेअरस्टो याने ५५ धावांची खेळी आणि मनीष पांडेने नाबाद ६१ धावांची खेळी केली. परंतु ही खेळी व्यर्थ गेली. कोलकाता नाईट रायडर्स संघाने हा सामना १० धावांनी आपल्या नावावर केला.

महत्त्वाच्या बातम्या-

नवा कर्णधार सॅमसनपुढे अनुभवी राहुलचे आव्हान, ‘अशी’ असेल राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्जची प्लेइंग XI

‘काय सुरुवात होती,’ पृथ्वी शॉच्या सुपरहिट फलंदाजीची गर्लफ्रेंडलाही पडली भुरळ; केली स्तुती

कोलकाताची १० धावांनी हैदराबादवर मात, कर्णधार वॉर्नरने ‘यांना’ पराभवासाठी धरले जबाबदार 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---