---Advertisement---

‘काय सुरुवात होती,’ पृथ्वी शॉच्या सुपरहिट फलंदाजीची गर्लफ्रेंडलाही पडली भुरळ; केली स्तुती

On: सोमवार, एप्रिल 12, 2021 9:32 AM
---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएल २०२१च्या दुसऱ्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला पराभूत करत हंगामाची जोरदार सुरुवात केली. या सामन्यात युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याने चौफेर फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले होते. त्याने अर्धशतक झळकावत टीका करणाऱ्यांना सडेतोड प्रत्युतत्तर दिले आहे. यानंतर गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असणाऱ्या त्याच्या गर्लफ्रेंडने देखील इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत त्याच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.

चेन्नई सुपर किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना दिलेल्या १८८ धावांचा पाठलाग करत असताना, पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी दिल्ली संघाला ताबडतोड सुरुवात करून दिली होती. शॉने ३८ चेंडूत ७२ धावांची खेळी केली होती. यात त्याने ९ चौकार आणि ३ षटकार मारले होते. यासोबतच धवनने ५४ चेंडूत ८५ धावांची खेळी केली होती. यात त्याने १० चौकार आणि २ षटकार लगावले होते. या खेळीच्या जोरावर दिल्ली संघाने सामना ७ गडी राखून आपल्या नावावर केला होता.

गेल्या काही महिन्यांपासून पृथ्वी शॉ प्राची सिंगला डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर जोर धरत आहे. तसेच सामना झाल्यानंतर प्राचीने पृथ्वी शॉचा फोटो आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. ज्यावर तिने हार्टची ईमोजी टाकत, “काय सुरुवात आहे शॉ” असे लिहिले होते.

कोण आहे प्राची सिंग?
प्राची सिंह ही अभिनय क्षेत्रात नवीनच आहे. तिने आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात कलर्स टिव्हीवर येणाऱ्या ‘उडान’ या मालिकेतून केली होती. तिने या मालिकेत वांशिका शर्माची भूमिका साकारली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

SRH विरुद्ध ‘भज्जी’ने केवळ एक षटक केली गोलंदाजी; कर्णधार मॉर्गनने सांगितले यामागचे कारण

नितीश राणाचा नवा पॅटर्न! अर्धशतक झळकावताच केले आगळेवेगळे सेलिब्रेशन, सोशल मीडियावर एकच चर्चा

Video: मनिष पांडेने टिपला आंद्रे रसेलचा भन्नाट झेल अन् स्टेडियममधील ‘त्या’ सुंदरीच्या रिऍक्शनने वेधले सर्वांचे लक्ष

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---