नारायणगाव | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूल व पुणे जिल्हा हौशी ऍथलेटिक्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कै. प्रल्हाद सावंत स्मृती चषक जिल्हास्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धा नारायणगाव येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन आ.अतुल बेनके यांच्या शुभहस्ते व जिल्हा ऍथलेटिक्स संघटनेच्या गुरबंज कौर, किशोर शिंदे, वसंत गोखले, हर्षल निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
महिला आणि पुरुषांच्या विविध वयोगटांमध्ये खेळावल्या गेलेल्या या स्पर्धेमध्ये तब्बल ४५० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या जिल्हास्तरीय स्पर्धेतील विजेत्यांची निवड राज्य पातळीवरील स्पर्धांसाठी होणार आहे. ट्रॅकफॉरच्यून स्पोर्ट्स क्लब, नारायणगाव आणि अमित बेनके युवा मंच यांच्या सहकार्याने या स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते.
क्रिकेट, फुटबॉल या खेळाप्रमाणे ऍथलेटिक्स खेळांना देखील प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ऍथलेटिक्ससाठी चांगले खेळाडू तयार झाले पाहिजेत. यासाठी अशा स्पर्धांना प्रोत्साहन दिले पाहिजे असे मत आ.अतुल बेनके यांनी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मांडले.
स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी सुजित खैरे, अमित बेनके, राजेंद्र कोल्हे, रमेश मेहेत्रे, राजेश कोल्हे यांसह जिल्ह्यातील विविध भागातून आलेले क्रीडा प्रशिक्षक, संघटनेचे पदाधिकारी, खेळाडू व विविध मान्यवर उपस्थित होते.
सदर स्पर्धेचा बक्षीस समारंभ युवा नेते अमित बेनके, डॉ.सदानंद राऊत, क्रीडा शिक्षक राहुल नवले या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. पुरुष गटामध्ये मिनी ऑरेंज संघाला विजेतेपद व महिला संघाचे विजेतेपद इलिट ॲथलिट संघाला मिळाले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विल्सन ॲंड्रूज यांनी केले. स्पर्धा प्रसंगी पुणे जिल्हा हौशी ऍथलेटिक्स असोसिएशनचे सहसचिव किशोर कुमार शिंदे, पुणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे खजिनदार राजू कुलकर्णी, मधू देसाई, वसंत गोखले जिजामाता पुरस्कार प्राप्त गुरुबंस कौर, हर्षल निकम, पोर्णिमा जाधव, हर्षदा जोशी उपस्थित होते .
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा प्रशिक्षक तुळशीदास कोऱ्हाळे, प्रशांत खैरे, सुरज वाजगे, अभिजीत विटे, मुकेश वाजगे, स्वप्निल ढवळे यांनी विशेष सहकार्य केले.
या स्पर्धेमध्ये खालील खेळाडूंनी यश संपादन केले –
१६ वर्षाखालील मुली २ किमी धावणे
१ मानसी यादव (भारतीय जैन संघटना )7.4 मि. – प्रथम
२ ज्ञानेश्वरी फडतरे 7.5 मि. – द्वितीय
३. आर्शिया पवार (पुणे अथलेटिक्स) ७:०६ मि. – तृतीय
१८ वर्षाखालील मुली ४ किमी
१. सपना चौधरी (लक्ष अकॅडमी) १५.७३४ मि. – प्रथम
२. वेदश्री लोणारे (एलिट ॲथलिट) १६:२ मि. – द्वितीय
३. बुद्धकुमारी कुमार (आझम कॅम्पस) १६:४ मि. – तृतीय
२० वर्षाखालील मुली ६ किमी धावणे
१. समीक्षा खरे (पुणे ॲथलेटीक्स) २६: ५.मि. – प्रथम
२. नेहा पिंगळे (ट्रॅक फॉरचून) २७:७ मि. – द्वितीय
३. वैष्णवी जवळे (सेंट मेरीज) २८:४ मि. – तृतीय
महिला १० किमी धावणे
१. प्रेमलता यादव (मिनी ऑरेंज) ३९:३. मि. – प्रथम
२. वृषाली उत्तेकर (एलिट रनर्स) ४१:५. मि. – द्वितीय
३.विनया मालुसरे (एलिट रनर्स) ४२ : ३.मि. – तृतीय
१६ वर्षाखालील मुले २ किमी धावणे
१. तेहलिबा सोरम (मिनी ऑरेंज) ६:५ मि. – प्रथम
२. रोहित वर्मा (लक्ष अकॅडमी) ६: ६ मि. – द्वितीय
३. नितेश यादव (आझम कॅम्पस) ६:७ मि. – तृतीय
१८ वर्षाखालील मुले ६ किमी
१. गौरव भोसले (एलिट रनर) २०.३ मि. – प्रथम
२. करण वागवले (पुणे ॲथलेटिक्स) २०: ७.मि. – द्वितीय
३. उस्मान राजपूत (अभिजित कदम स्पोर्ट्स क्लब) २१:२. मि. – तृतीय
२० वर्षाखालील मुले ८ किमी धावणे
१. अमित कुमार (एलिट रनर) २६: ७ मि. – प्रथम
२. गणेश आठवले (वननेस) २७:४ मि. – द्वितीय
३. ओमकार जाधव मिनी (मिनी ऑरेंज) २८:५ मि. तृतीय
पुरुष १० किमी धावणे
१. मनोजकुमार यादव (मिनी ऑरेंज) ३३:२ मि – .प्रथम
२.मनी सिंग (मिनी ऑरेंज) ३३:३. मि. – द्वितीय
३. नागेश कारंडे (मिनी ऑरेंज) ३४: २.मि. – तृतीय
महत्त्वाच्या बातम्या –
अबब! एकाच दिवसात ‘या’ मोठ्या स्पर्धेत कुटल्या गेल्या तब्बल २५०० धावा
रोहितने दिले संकेत, ३५ वर्षांचा ‘हा’ गोलंदाज ठरू शकतो भारतीय संघातील हुकमी एक्का
भारताची उंचावली मान! अंजू बॉबी जॉर्ज ठरली ‘वुमन ऑफ द इयर’