पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित व पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने होत असलेल्या डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती करंडक पुणे जिल्हा मानांकन अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत 15वर्षांखालील मुलांच्या गटात प्रणव घोळकर याने तर, मुलींच्या गटात रुचिता दारवाटकर या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
पीवायसी क्लबच्या हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत 15 वर्षांखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित पुण्याच्या प्रणव घोळकर याने अर्णव झगडेचा 11-2, 11-8, 10-12, 11-5, 5-11, 10-12, 11-9 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. प्रणव हा न्यू इंडिया शाळेत नववी इयत्तेत शिकत असून डेक्कन जिमखाना येथे प्रशिक्षक सुनील बाबरस यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. याच मुलींच्या गटात अंतिम लढतीत अव्वल मानांकित रुचिता दारवटकरने दुसऱ्या मानांकित जान्हवी फणसेचा 11-4, 11-4, 11-7, 11-9 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
19 वर्षांखालील मुलांच्या गटात उपांत्य फेरीत बिगरमानांकित आदित्य जोरीने अव्वल मानांकित प्रणव घोळकरचा 11-9, 11-7, 11-9, 7-11, 9-11, 11-9 असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. तर दुसऱ्या सामन्यात आरुप साहाने सातव्या मानांकित वेदांग जोशीचा 11-7, 11-3, 11-8, 11-4 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: 13 वर्षांखालील मुले: उपउपांत्यपूर्व फेरी:
श्रेयस माणकेश्वर[1] वि.वि.अर्जुन कोसंदर 11-4, 11-8, 11-7;
मोहिल ठाकूर वि.वि.रेयांश अग्रवाल 12-10, 11-4, 11-3;
स्वरूप भाडळकर वि.वि.अर्णव सरपोतदार 11-2, 11-8, 11-8;
आदित्य सामंत वि.वि.अनंत कारमपुरी 8-11, 11-2, 11-6, 11-7;
राजस भावे वि.वि.अविष्कार जाधव 11-7, 11-8, 10-12, 10-12, 11-6;
15 वर्षांखालील मुले: उपांत्य फेरी:
प्रणव घोळकर[1] वि.वि.शौरेन सोमण[5] 11-3, 7-11, 11-3, 11-7, 11-7;
अर्णव झगडे[2] वि.वि.आराध्या पाटील[6] 11-4, 11-7, 11-6, 11-4;
अंतिम फेरी:प्रणव घोळकर[1]वि.वि.अर्णव झगडे 11-2, 11-8, 10-12, 11-5, 5-11, 10-12, 11-9;
15 वर्षाखालील मुली:
रुचिता दारवटकर[1]वि.वि.सई कुलकर्णी[5] 11-7, 11-6, 12-10, 11-8;
जान्हवी फणसे[2] वि.वि.तनया अभ्यंकर[3] 3-11, 5-11, 11-7, 11-7, 11-9, 1-11, 11-8;
अंतिम फेरी: रुचिता दारवटकर[1]वि.वि.जान्हवी फणसे[2]11-4, 11-4, 11-7, 11-9;
17वर्षांखालील मुली: उपांत्य फेरी:
पृथा वर्टीकर[1] वि.वि.आशिका शर्मा[5] 9-11, 11-7, 11-7, 11-5, 11-2;
रुचिता दरवटकर[3] वि.वि.राधिका सकपाळ[2] 9-11, 11-7, 11-9, 10-12, 12-14, 11-6, 13-11;
17 वर्षांखालील मुले: उपांत्य फेरी:
प्रणव घोळकर[1] वि.वि.वेदांग जोशी[4]11-3, 11-9, 13-11, 11-9;
रामानुज जाधव[6]वि.वि.प्रणव खेडकर[2] 11-8, 11-4, 11-6, 11-9;
19 वर्षांखालील मुले:उपांत्य फेरी:
आदित्य जोरी वि.वि.प्रणव घोळकर[1] 11-9, 11-7, 11-9, 7-11, 9-11, 11-9;
आरुप साहा वि.वि.वेदांग जोशी[7]11-7, 11-3, 11-8, 11-4;
19वर्षांखालील मुली:
पृथा वर्टीकर[1]वि.वि.निधी भांडारकर[5] 11-2, 11-5, 11-5, 11-7;
धनश्री पवार[2]वि.वि. राधिका सकपाळ[3]11-9, 9-11, 11-8, 11-5, 8-11, 11-8;
शत्रू नव्हे प्रतिस्पर्धी! विराटच्या पुनरागमनासाठी आफ्रिदी करतोय प्रार्थना, व्हिडिओ जिंकेल मन
नवी जर्सी समोर आली रे..! एशिया कपसाठी अशी आहे भारताची जर्सी, लोगोवरील ३ स्टार्सचे खास महत्त्व