इंडियन प्रीमीयर लीगचा यावर्षी १५ वा हंगाम खेळवला जाणार आहे. या हंगामापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी लिलाव झाला. बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात अनेक स्टार खेळाडूंना कोट्यावधी रुपयांची बोली लागलेली पाहाला मिळाली. या लिलावात गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स या दोन नव्या संघांनीही जुन्या ८ संघांसह सहभाग घेतला होता. त्यामुळे एकूण १० संघात खेळाडूंना खरेदी करण्यासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळाली. नुकतीच वेस्ट इंडिजविरूद्धची वनडे मालिका गाजवणाऱ्या प्रसिद्ध कृष्णा याला या लिलावात मोठी बोली लागली.
Pacer @prasidh43 is SOLD to @rajasthanroyals for INR 10 crore 💰😎👌#TATAIPLAuction @TataCompanies
— IndianPremierLeague (@IPL) February 12, 2022
अवघ्या एका दिवसापूर्वी वेस्ट इंडिज विरुद्ध वनडे मालिकेत मालिकावीर पुरस्कार पटकावणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाला राजस्थान रॉयल्सने १० कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात सामील करून घेतले.
कृष्णा याच्यासाठी बराच वेळ बोली लागत राहिली. कोलकाता नाईट रायडर्स व लखनऊ सुपरजायंट्स संघांनी बोलीची सुरुवात केली होती. मात्र, राजस्थान रॉयल्स व गुजरात टायटन्स यांनी लिलावात उडी घेतली. त्यांनी अत्यंत त्वेषाने बोली लावली त्याची किंमत वाढवली. अखेरीस गुजरातने माघार घेतल्यामुळे कृष्णा राजस्थान संघात सामील झाला.
लॉकी फर्ग्युसनला गुजरात टायटन्सने केले लॉक
तर दूसरीकडे नव्या गुजरात टायटन्सने गोलंदाज लॉकी फर्ग्युसनला १० कोटींना विकत घेतले आहे. तो २ कोटींच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरला होता. त्याला विकत घेण्यासाठी गुजरात संघाने आधीपासूनच बोली लावायला सुरुवात केली होती. त्यांच्यासोबतत शर्यतीत दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ होते. परंतु गुजरातने १० कोटी मोजत अखेर त्याला आपल्या ताफ्यात सहभागी केले आहे. तो आयपीएल २०२१ मध्ये तो कोलकाता नाईट रायडर्सचा भाग होता.