इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात गुरुवारपासून (०२ सप्टेंबर) केनिंग्टन ओव्हल स्टेडियम, लंडन येथे चौथा कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात युवा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याची निवड करण्यात आली आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाच्या विनंतीनंतर भारताच्या वरिष्ठ निवड हा निर्णय घेतला असून सामन्याच्या एक दिवस आधी म्हणजेच बुधवारी (०१ सप्टेंबर) बीसीसीआयने यासंदर्भात घोषणा केली आहे.
प्रसिद्धला स्टँडबाय खेळाडूच्या रुपात इंग्लंड दौऱ्यावर जागा देण्यात आली होती. जर त्याला इंग्लंडविरुद्ध चौथ्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळाली. तर तो कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करेल.
प्रसिद्धने यावर्षीच मायदेशात इंग्लंडविरुद्ध वनडेद्वारे आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्याने या मालिकेत इंग्लंडविरुद्ध ३ सामने खेळताना ६ विकेट्स घेतल्या होत्या. दरम्यान ५४ धावांवर ४ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कामगिरीविषयी बोलायचे झाल्यास, या २५ वर्षीय गोलंदाजाला केवळ ९ प्रथम श्रेणी सामन्यांचा अनुभव आहे. या सामन्यांमध्ये त्याने ३४ विकेट्स चटकावल्या आहेत.
अशात त्याला चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारताच्या अंतिम एकादशमध्ये संधी मिळाल्यास तो आपली छाप सोडण्याचा प्रयत्न करेल.
दरम्यान, इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील कसोटी मालिका सध्या १-१ ने बरोबरीत आहे. नॉटिंघम येथे झालेला पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णीत राहिला होता. त्यानंतर लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर दमदार प्रदर्शन करत भारताने इंग्लंडला पराभूत केले होते. पुढे लीड्स येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने मागील पराभवाचा वचपा काढत भारतीय संघाला एका डाव आणि ७४ धावांची धूळ चारली. अशाप्रकारे ही मालिका १-१ ने बरोबरीत आहे. त्यामुळे उभय संघांमध्ये होणारा येता चौथा कसोटी सामना महत्त्वाचा असणार आहे.
UPDATE – Prasidh Krishna added to India’s squad
More details here – https://t.co/Bun5KzLw9G #ENGvIND pic.twitter.com/IO4JWtmwnF
— BCCI (@BCCI) September 1, 2021
चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा, केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), अभिमन्यू ईश्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, प्रसिद्ध कृष्णा
महत्त्वाच्या बातम्या-
सलग ३ शतके ठोकत जो रूटचे कसोटी क्रमवारीत वर्चस्व, रोहितनेही विराटला केले ओव्हरटेक
द्रविडच्या शिष्याचे ओमानविरुद्ध दमदार शतक, दुसऱ्या वनडेत मुबंईचा २३१ धावांनी दणदणीत विजय