---Advertisement---

वनडे पदार्पणात ४ विकेट्स घेणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाने ‘या’ ऑस्ट्रेलियन दिग्गजाकडून गिरवलेत गोलंदाजीचे धडे

On: गुरूवार, मार्च 25, 2021 10:56 AM
---Advertisement---

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर रंगलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने पराभवाची धूळ चारली आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ३१७ धावांचा डोंगर उभा केला होता. ३१८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंड संघ अवघे २५१ धावा करु शकला. हा सामना भारतीय संघाने ६६ धावांनी जिंकला होता. तसेच या सामन्यात पदार्पण करणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाने ४ गडी बाद केले होते. या सामन्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅकग्राचे त्याच्या कारकिर्दीत काय योगदान आहे, याची माहिती दिली आहे.

भारतीय संघाने इंग्लिश संघासमोर ३१८ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लिश संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. त्यानंतर प्रसिद्ध कृष्णाने येऊन सलामी फलंदाज जेसन रॉयला माघारी धाडत भारतीय संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले होते. त्याने या सामन्यात महत्वाचे ५४ धावांत ४ गडी बाद केले होते. त्यावेळी तो भारताकडून वनडे पदार्पणाच्या सामन्यात ४ गडी बाद करणारा पहिलाच गोलंदाज ठरला.

प्रसिद्ध कृष्णाने २०१७ मध्ये ग्लेन मॅकग्राकडून एमआरएफ पेस अकॅडमीमध्ये जलद गोलंदाजीचे प्रशिक्षण घेतले होते. या सामन्यानंतर, मॅकग्राने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट करत त्याचे कौतुक केले होते. त्याने लिहिले होते की, “अभिनंदन प्रसिद्ध ४/५४. तसेच वनडे पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक गडी बाद भारतीय गोलंदाज ठरल्यामुळे देखील, शब्बास मित्रा.”

ग्लेन मॅकग्रा बद्दल बोलताना प्रसिद्ध कृष्णा म्हणाला..

“सर्वात मोठा बदल त्यांनी माझ्यात घडवून आणला तो म्हणजे, त्यांनी मला मनातून खूप शांत आणि संयमी बनवले. यासोबतच ते वेगवेगळ्या खेळपट्टीवर चेंडूची लांबी आणि दिशा कशी असावी, या गोष्टींवर खूप भर देत असत. त्यांनी नेहमी स्थिर रहा असे म्हटले. पहिली गोष्ट मी त्यांच्याकडून शिकलो होतो की, जेव्हा तुम्ही खेळत असता, त्यावेळी त्या परिस्थितीमध्ये सावध कसे राहावे. कुठल्याही गोलंदाजांसाठी ही महत्वाची गोष्ट असते.”

प्रसिद्ध कृष्णाची उल्लेखनीय कामगिरी

इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. भारतीय संघाने दिलेल्या ३१८ धावांचा पाठलाग करताना, इंग्लिश सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात करून दिली होती. त्यानंतर १४ व्या षटकात प्रसिद्ध कृष्णाने जेसन रॉयला बाद करत इंग्लंड संघाला पहिला धक्का दिला होता. त्यानंतर भारतीय संघाने सामन्यात पुनरागमन केले होते. या सामन्यात प्रसिद्ध कृष्णाने ८.१ षटकात ५४ धावा देत ४ गडी बाद केले होते. यात त्याने १ निर्धाव षटक देखील फेकले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

भारताच्या युवा खेळाडूंच्या यशामागे राहुल द्रविडचे योगदान, इंग्लंडच्या दिग्गज कर्णधाराने उधळली स्तुतीसुमने

पॉंटिंगच्या नजरेत भरला म्हणून भारतासाठी खेळला; वाचा अशोक डिंडाच्या आयपीएल एन्ट्रीची शानदार कहाणी

दुसऱ्या वनडेसाठी भारतीय संघात होऊ शकतात ‘हे’ तीन बदल; एका खेळाडूला वनडे पदार्पणाची संधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---