Ranji Trophy 2024: विदर्भ उद्या मनिपूर विरुद्ध सामना खेळणार आहे. या साखळी सामना फेरीत 137 सामन्यांपैकी 23 वा उद्या सामना खेळला जाणार आहे. विदर्भाने आपला पहिला सामना सर्विसेस संघासोबत खेळला होता. तर मनिपूरने महाराष्ट्राचे आव्हानाला पहिल्या सामन्यात तोंड दिले. आता हंगामातील दुसऱ्या सामन्यात विदर्भ आणि मनिपूर संघ आमने सामने आहेत.
यावर्षी रणजी ट्रॉफीचा 89वा हंगाम खेळला जात आहे. त्यामध्ये सलग दोन वेळा विजेता (2018, 2019) असलेला विदर्भ संघ आपला दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. विदर्भला आपला हंगामातील दुसरा सामना मनिपूर संघाविरुद्ध खेळणार आहे. हा सामना गुजरातमध्ये खेळला जाणार आहे. विदर्भने हंगामातील आपला पहिला सामना सर्विसेस संघासोबत खेळला होता. या सामन्यात विदर्भाने 7 विकेट्सने सर्विसेसला पराभूत केले होते. सर्विसेसने पहिल्या डावात 241, तर दुसऱ्या डावात 155 धावा केल्या. त्याच्या प्रत्युत्तरात विदर्भाने 219 आणि 178/3 अशी खेळी केली आणि सर्विसेसला मात दिली. रजत पलीवल (Rajat Paliwal) याने सर्वाधिक 84 धावा काढल्या. तर विदर्भाकडून 84 धावा काढल्या.
साखळी सामना फेरीत 137 सामन्यांपैकी 23 वा सामना उद्या होणार आहे. विदर्भ संघ हा ‘अ’ गटात आहे. गुणतालिकामध्ये संध्या संघ दुसऱ्या क्रमांकावर असून उद्या होणाऱ्या सामन्यानंतर गुणतालिकेत बदल होऊ शकतो. हंगामातील दुसरा सामन्यात विदर्भ संघ विजयी ठरणार की पराभूत होणार, यावर गुणतालिकेचे पुढचे चित्र ठरेल. दुसरीकडे मनिपूर संघ हंगामातील आपल्या पहिल्या सामन्यात पराभूत झाला आहे. महाराष्ट्र संघाकडून त्यांना 69 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. अशात मनिपूर आपल्या पहिल्या विजयासाठी विदर्भविरुद्ध मैदानात उतरेल. शुक्रवारी (12 जानेवारीला) विदर्भ आणि मनिपूरमध्ये यांच्यातील लढत सकाळी 9.30 वाजता सुरू होईल. (Preview of Ranji Trophy match between Vidarbha and Manipur)
यातून निवडली जाणार प्लेइंग इलेव्हन –
विदर्भ संघ– अक्षय वाडकर (कर्णधार), आदित्य सरवाते, शिभम दुबे, हर्ष दुबे, फैज फजल, मोहीत काळे, ललित यादव, करुण नायर, दर्शन नलकांडे, यश राठोड, संजय रघुनाथ, ध्रुव शौर्य, आदित्य ठाकरे, अक्षय वखारे, सिध्देश वाढ, उमेश यादव, यश ठाकूर
मनिपूर – लंगलोन्यंब मीतन केशांगबम, बरीस रहमान, बिकास सिंग, जॉन्सन सिंग, एल किशन सिंग, बिश्वरजित कोंथौजम, रोनाल्ड लाँगजॅम, नारिसिंग यादव, नितेश सेडाई, कंगबम प्रियोजित, लामाबम सिंग, प्रफुल्लमणी सिंग, किशन ठोकचोम, रेक्स राजकुमार, कर्णजित यमनाम
महत्त्वाच्या बातमी
IND vs AFG । कर्णधार रोहित बनणार सर्वात भारी, कॅप्टन कुलचा मोठा विक्रम निशाण्यावर
Video: चाहत्यानी सर्वांसमोरच धरले राहुलचे पाय, यष्टीरक्षकाच्या कृतीने जिंकली लोकांची मने