विंडिजविरूद्धच्या वन-डे मालिकेतील पहिल्या दोन वन-डे सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. रिषभ पंतला पहिल्या दोन सामन्यासाठीच्या संघात स्थान देण्यात आले आहे.
2019 ची विश्वचषक स्पर्धा लक्षात घेऊन भारतीय संघ निवड करण्यात आली असल्याचे निवड समितीकडून सांगण्यात आले आहे. दिनेश कार्तिकला संघातून वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी धोनीला पर्यायी यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंतला संघाला स्थान देण्यात आले आहे.
सध्या भारतीय कसोटी संघात खेळणाऱ्या रिषभने सलग तीन डावात 90 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. त्यामुळे तो 6 किंवा 7 व्या क्रमांकावर फलंदाजी करु शकतो.
पंतचा संघात समावेश झाल्यानंतर पदार्पणात दमदार शतक आणि त्याच्यानंतरच्या खेळीत 70 धावांची आक्रमक खेळी केलेल्या पृथ्वी शाॅला देखील वन-डे संघात देण्यात येण्याची शक्यता आहे.
त्यामध्ये पृथ्वीच वय आणि अनुभव हा खरा चिंतेचा विषय असला तरी त्याने कसोटीतील कामगिरीने आपण वन-डेत खेळण्यासाठी तयार आहोत असे दाखवून दिले आहे.
तो ज्या आक्रमक पद्धतीने कसोटीत खेळतो. त्यावरून तो मर्यादित षटकांच्या सामन्यात देखील चांगली कामगिरी करु शकतो असे दिसत आहे.
भारतीय संघाचे सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा हे दोघही उत्तम कामगिरी करत आहेत. केएल राहुल देखील मर्यादित षटकांच्या सामन्यात चांगली फलंदाजी करत आहे. तरीही पृथ्वीला वन-डे संघात संधी द्यायला पाहिजे मिळायला पाहिजे.
महत्वाच्या बातम्या-
- वाढदिवस विशेष: गौतम गंभीरबद्दल या खास ५ गोष्टी माहित आहेत का?
- विंडिज विरुद्ध दमदार कामगिरी करणाऱ्या पृथ्वी शॉच्या कुटुंबाला मनसेकडून धमक्या
- दुसऱ्या टी-२० सामन्यात विजयासह दक्षिण अफ्रिकेची मोठ्या क्रिकेट मालिकेत विजयी आघाडी