राजकोट | भारत विरुद्ध विंडीज पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी युवा प्रतिभावान खेळाडू पृथ्वी शाॅने शानदार शतकी खेळी केली. ९९ चेंडूंचा सामना करताना त्याने नाबाद १०० धावा केल्या.
याबरोबर कसोटी पदार्पणात शतक करणारा तो जगातील १०६वा खेळाडू ठरला. या खेळीबरोबर शाॅने अनेक विक्रम केले. ते असे-
-भारताकडून वैयक्तिक पहिले कसोटी शतक करताना आजपर्यंतचे ५वे वेगवान शतक. धवन (८५), पंड्या (८६), धोनी (९३) आणि के श्रीकांत (९७) यांनी पृथ्वीपेक्षा कमी चेंडूत आपले पहिले कसोटी शतक केले होते.
-कसोटी पदार्पणात वेगवान शतक करणारा तसेच १००पेक्षा कमी चेंडूत शतक करणारा तिसरा खेळाडू. यापूर्वी शिखर धवन (८५) आणि ड्वेन स्मिथ (९३) यांनी अशी कामगिरी केली आहे.
– भारताकडून कमी वयात कसोटी शतक करणारा सचिननंतरचा दुसरा खेळाडू. सचिनने १७ वर्ष आणि ११२ दिवसांचा असताना शतक केले होते.
-कसोटी पदार्पणात शतक करणारा पृथ्वी शाॅ केवळ तिसरा मुंबईकर. यापुर्वी रोहित शर्मा २०१३ आणि प्रविण आम्रे १९९२ यांनी हा पराक्रम केला आहे.
-दुलिप ट्राॅफी, रणजी ट्राॅफी आणि कसोटी पदार्पणात शतक करणारा पृथ्वी शाॅ भारतातील पहिलाच खेळाडू.
-पृथ्वी शाॅने राजकोटवरच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि त्यात शतकी खेळी केली होती. तसेच आजही त्याने याच मैदानावर आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि शतक केले.
-प्रथम श्रेणी पदार्पण आणि कसोटी पदार्पणात शतक करणारा पृथ्वी शाॅ जगातील तिसराच खेळाडू. यापुर्वी गुंडप्पा विश्वनाथ, डर्क वेलहॅम यांनी हा कारनामा केला आहे.
-वयाची २० वर्ष पुर्ण करण्यापुर्वी कसोटीत शतक करणारा शाॅ सचिननंतर दुसराच खेळाडू. सचिनने तेव्हा ५ शतके केली होती.
https://twitter.com/BCCI/status/1047748171986653185
महत्त्वाच्या बातम्या-
- सर्वात कमी वयात कसोटी सामन्यातील पहिला चेंडू खेळणारे ४ खेळाडू
- कुंबळे अझरूद्दिनचा चाहता तर त्याची बायको धोनीची चाहती
- भारताविरुद्ध कसोटीत चमकदार कामगिरी करणाऱ्या सॅम करनचा मोठा सन्मान
- टीम इंडियाकडून कसोटी पदार्पण करणारा शाॅ चौथा सर्वात युवा खेळाडू