सध्या भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ अत्यंत खराब फॉर्ममधून जात आहे आहे. आयपीएलच्या १३ व्या सत्रात तो अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला. त्याने १३ सामन्यात फक्त २२८ धावा केल्या होत्या. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सने त्याला हंगामाच्या अखेरीस संघातून वगळले होते. ऑस्ट्रेलियामध्येही आल्यानंतर ही तो फॉर्ममध्ये दिसत नाही. पृथ्वी शॉने ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध दोन्ही सराव सामन्यांमध्ये डावाची सुरुवात केली. मात्र, त्याला यावेळी अजिबात छाप सोडता आली नाही. पृथ्वी फलंदाजीमध्ये प्रभाव पाडू शकला नसला तरी, त्याने गोलंदाजी करताना एक स्वप्नवत चेंडू टाकून सर्वांना आश्चर्यचकित केले.
पहिल्या कसोटीत संधी मिळण्याची शक्यता कमी
ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या दोन सराव सामन्यांत इतर सलामीवीर शुबमन गिल आणि मयंक अगरवाल यांनी अर्धशतके ठोकली. त्याचवेळी पृथ्वी शॉने चार डावांमध्ये अवघ्या ६२ धावा केल्या. त्यापैकी ४० धावा एका डावात काढल्या गेल्या होत्या. म्हणूनच, पहिल्या एॅडलेड कसोटीत प्लेइंग इलेव्हनमधील त्याच्या समावेशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ऍलन बॉर्डर, सुनील गावसकर यांच्यासारख्या दिग्गजांनी रोहित शर्माच्या अनुपस्थितीत शुबमनला मयंक अगरवालसोबत सलामीचा पाठवण्याचा सल्ला दिला आहे.
गोलंदाजी करताना टाकला ‘ड्रीम बॉल’
पहिल्या कसोटीसाठी शॉला संधी मिळेल की नाही हे फक्त वेळच सांगेल. तो सराव सामन्यांत अपयशी ठरला असला तरी, त्याने त्याचा प्रभाव गोलंदाजी करताना टाकला. सराव सामन्यात टाकलेल्या तीन षटकांत त्याने टाकलेल्या तीन षटकात त्याला एकही बळी मिळाला नाही. मात्र, त्याने टाकलेल्या एका लेग ब्रेक चेंडूने सर्वांची मने जिंकली.
हा चेंडू यष्टीरक्षक वृद्धिमान साहासोबत सर्वांना चकवत, मागे गेला. कामचलाऊ गोलंदाजी करणार्या पृथ्वीने हा ‘ड्रीम बॉल’ टाकत, सर्वांना आवाक् केले. लेग स्टंपवर फेकलेला हा चेंडू फलंदाज जॅक विल्डरमथपासून दूर जात, स्लीपमध्ये उभ्या असलेल्या कर्णधार अजिंक्य रहाणे आणि यष्टीरक्षक साहाच्या हाताला न लागता थर्डमॅनच्या दिशेने गेला.
इंस्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ
शॉने आपल्या चेंडूचा व्हिडीओ शेअर करताना लिहले, ‘कधीकधी असे सुखद धक्के बसतात की, मैदानावरील सर्वात सुरक्षित हात वृद्धि भाई आणि अजिंक्य दादा यांच्या हाताला न लागता चेंडू बाहेर जातो. पुन्हा असे व्हावे.’
https://www.instagram.com/p/CIvVLVGncjs/?utm_source=ig_web_copy_link
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान १७ डिसेंबर पासून चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होईल. मालिकेतील पहिली कसोटी ऍडलेड येथे दिवस-रात्र स्वरूपात गुलाबी चेंडूने खेळली जाईल. भारताचा कर्णधार विराट कोहली पहिली कसोटी खेळल्यानंतर, पालकत्व रजा घेऊन भारतात परतेल. त्यानंतर उर्वरित तीन सामन्यात अजिंक्य रहाणे भारताचे नेतृत्व करेल.
संबधित बातम्या:
– VIDEO: ऑस्ट्रेलियाच्या नवोदित अष्टपैलूचा दणका; शतकी खेळीनंतरपृथ्वी शॉला केले सापळा रचून बाद
– लईच भारी! पृथ्वी शॉने घेतला भन्नाट झेल; ऑस्ट्रेलियन कर्णधाराला धाडलं तंबूत, पाहा Video
– पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, या अष्टपैलूला तब्बल ४ वर्षांनंतर स्थान