देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी टी20 स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा 2022-2023 हंगाम सुरू आहे. स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीच्या एलिट ए गटात शुक्रवारी (14 ऑक्टोबर) मुंबई आणि आसाम यांच्या दरम्यान राजकोट येथे सामना खेळला गेला. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना अक्षरशः आसामच्या गोलंदाजांचे वाभाडे काढले. सलामीवीर पृथ्वी शॉने आपला शानदार फॉर्म कायम राखत झंझावाती शतक झळकावले. यावेळी त्याने विराट कोहली स्टाईलने शतक सेलेब्रेट केले आहे. त्याचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
आसामने नाणेफेक जिंकत मुंबईला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. आसामचा निर्णय त्यांच्या अंगलट आल्याचे दिसले कारण कर्णधार पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने चौकार-षटकांराचा पाऊस पाडत शतकी खेळी केली.
शॉने केवळ 46 चेंडूत शतक केले. तसेच 19 चेंडूत अर्धशतक केले. शतक करताच त्याने केलेल्या सेलेब्रेशने फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याच्या या सेलेब्रेशनचा अंदाच काहीसा भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याच्याशी मिळताजुळता दिसला. शॉने शतक करताच हेल्मेटऐवजी बॅटने जर्सीवरील क्रमांकाकडे इशारा केला. विराटनेही असेच काही केले आहे, त्यानेही जर्सी क्रमांकाकडे इशारा केला होता.
@PrithviShaw pic.twitter.com/4ZF21kUfjS
— Pritesh Chandarana (@Pritesh1062) October 14, 2022
शॉने या सामन्यात 61 चेंडूत 13 चौकार आणि 9 षटकाराच्या सहाय्याने 134 धावा केल्या. हे त्याचे टी20 प्रकारातील पहिले शतक ठरले आहे. त्याने यशस्वी जयस्वाल याच्यासोबत संघाच्या धावसंख्येचा दिडशे आकडा पार केला. या सामन्यात मुंबईने 20 षटकात 3 विकेट्स गमावत 230 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना आसामचा संघ 19.3 षटकात 169 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे मुंबईने हा सामना 61 धावांनी जिंकला.
शॉने भारताकडून पाच कसोटी आणि सहा वनडे सामने खेळले आहेत. कसोटीमध्ये त्याने एक शतक आणि दोन अर्धशतके ठोकली आहेत. तर एक आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळताना पहिल्याच चेंडूवर विकेट गमावून बसला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
काय भानगड! हरभजन सिंगच्या एकाच आवाजावर हादरलं पंजाब क्रिकेट असोसिएशन, अध्यक्षाने दिला राजीनामा
‘विश्वचषकासाठी संघनिवड चुकली’; माजी प्रशिक्षकाचे भारतीय संघावर ताशेरे; या गोलंदाजाचे केले समर्थन