---Advertisement---

पृथ्वी शॉचा मोठा निर्णय! मुंबईला रामराम केल्यानंतर आता ‘या’ टीमकडून खेळणार

On: शुक्रवार, जून 27, 2025 12:04 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा आक्रमक सलामीवीर पृथ्वी शॉने अखेर मुंबई क्रिकेट संघातून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. स्थानिक क्रिकेटमधील आपली पुढील कारकीर्द अधिक उज्वल करण्यासाठी शॉने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून (MCA) ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मागितले होते, आणि आता ही NOCही त्याला मिळाल्याने तो लवकरच नवीन संघात दाखल होणार आहे.

2024-25 च्या रणजी हंगामासाठी मुंबईने पृथ्वी शॉला आपल्या संघात स्थान दिलं नव्हतं. त्यामुळे नाराज झालेल्या शॉने दुसऱ्या संघात संधी शोधण्याचा मार्ग स्वीकारला. ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, शॉला देशातील 2-3 राज्य संघांकडून ऑफर्स आल्या असून, तो महाराष्ट्र संघात सहभागी होण्याच्या मार्गावर आहे.

विशेष म्हणजे, महाराष्ट्र संघाचे नेतृत्व सध्या चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) स्टार आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड करत आहे. अशा स्थितीत, शॉ आणि ऋतुराज हे दोघं आयपीएलमध्ये समोरासमोर खेळले असले तरी आता एकाच संघासाठी खेळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबई संघातून वगळण्यात आल्यानंतरही शॉचं नाव देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठं आहे. त्याचं भारतीय संघात स्थान अजून पक्कं झालेलं नसल्याने तो महाराष्ट्रकडून जास्तीत जास्त सामने खेळू शकतो. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

पृथ्वी शाॅबद्दल एमसीएने एका निवेदनात सांगितलं, “क्रिकेटपटू पृथ्वी शॉने आगामी देशांतर्गत हंगामात व्यावसायिक खेळाडू म्हणून दुसऱ्या राज्यासाठी खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी त्याने आमच्याकडे अधिकृतपणे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मागितलं. या प्रकरणाचा सविस्तर विचार करून, आम्ही त्याला NOC देण्याचा निर्णय घेतला आहे.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---