भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ याने मॉडल आणि अभिनेत्री निधी तापडिया सोबत त्याचे नाते सर्वांसोबत शेअर केले. शॉने मंगळवारी (14 फेब्रुवारी) म्हणजेच वॉलेंटाइन्स डे रोजी त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून एक स्टोरी शेअर केली. वॉलेंटाइन डेची वेळ साधून शॉने निधीसोबतचा एक फोटो स्टोरीला शेअर केला. फोटोत हे लव्ह बर्ड्स एकमेकांकडे पाहून पोज देताना दिसत आहेत.
निधी तापडिया (Nidhhi Tapadiaa) सोबतचा फोटो इंस्टाग्राम स्टोरीला ठेवल्यानंतर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw ) याने काही वेळातच ही स्टोरी डिलिट देखील केली. मात्र, तोपर्यंत स्टोरिचे स्क्रिनशॉट्स काढले गेले होते. शॉने जरी ही स्टोरी डिलीट केली असली, तरी निधी तापडियासोबतचा त्याचा फोटो सर्वत्र व्हायरल होत आहे. निधीने नुकत्याच काही दिवसांपूर्वी शॉच्या इंस्टाग्राम पोस्टवर कमेंट केली होती, ज्यामुळे या दोघांच्या प्रेमसंबंधाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अशातच आता हे फोटो व्हायरल झाल्यानंतर या चर्चांना एकप्रकारे पुष्टी मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी शॉ आणि निधी एकत्र कश्मीरला फिरायला गेल्याचेही समोर आले होते.
https://www.instagram.com/p/CoUbPDypV-J/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, शॉच्या क्रिकेट कारकिर्दीचा विचार केला, तर 23 वर्षीय सलामीवीर फलंदाज मागच्या 18 महिन्यापासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाहीये. मागच्या महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी त्याला संघात निवडले गेले, पण प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. शॉला यावेळीही संधी न मिळाल्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली. रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामात त्याने मुंबई शंघासाठी अप्रतिम प्रदर्शन केले आहे. आसाम संघाविरुद्धच्या एका सामन्यात त्याने तब्बल 379 धावांची खेली केली होती. त्याने आतापर्यंत मुंबई रणजी संघासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत.
https://www.instagram.com/p/CocgxK3vHim/?utm_source=ig_web_copy_link
कर्णधारपदाच्या शर्यतीत
भारतीय संघासाठी शॉने आतापर्यंत 5 कसोटी, 6 वनडे आणि 1 टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. आयपीएलमध्ये तो सध्या दिल्ली कॅपिटल्सचा महत्वाचा फलंदाज आहे. आघामी आयपीएल हंगामात शॉ दिल्ली संघाच्या कर्णधारपदासाठी दावेदार मानला जात आहे. संघाचा नियमित कर्णधार रिषभ पंत दुखापतीमुळे आगामी हंगामात खेळू शकरणार नाही. डिसेंबर 2022च्या शेवटच्या आठवड्यात पंतचा गंभीर अपघात झाला होता. अशात दिल्ली संघाला नवी न कर्णधार हवा आहे. कर्णधारपदासाठी शॉसमोर ऑस्ट्रेलियन दिग्गज डेविड वॉर्नर याचे आव्हान असेल. (Prithvi Shaw wrote- I love you my wifey, sealed the relationship)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हैदराबाद एफसी दुसरा क्रमांक पटकावण्यासाठी एटीके मोहन बागानविरुद्ध खेळणार
टीम इंडियाच्या मॅचविनरकडून ‘बिग बॉस’ विजेत्या एमसी स्टॅनचे अभिनंदन, केली खास सोशल मीडिया पोस्ट