भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ लवकरच न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या भारत अ संघात सामील होईल. त्याला कर्नाटकविरुद्धच्या रणजी करंडक सामन्यादरम्यान खांद्याची दुखापत झाल्याने तो सध्या भारत अ संघासह न्यूझीलंडला गेलेला नाही. पण आता तो या दुखापतीतून सावरला असून त्याने सरावालाही सुरुवात केली आहे.
त्याने बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सराव केला आहे. त्यामुळे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने आता स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्यासाठी त्याला परवानगी दिली आहे. त्यामुळे तो लवकरच न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय अ संघात सामील होईल.
शॉनेही दुखापतीतून सावरल्यानंतर फलंदाजीचा सराव करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
My favourite sound. The sound when the ball hits the middle of my bat. Superb net sessions going on. pic.twitter.com/Iw8bUJXE4N
— Prithvi Shaw (@PrithviShaw) January 14, 2020
शॉचा न्यूझीलंड दौऱ्यातील वनडे आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय अ संघात समावेश आहे. या दौऱ्यात भारतीय अ संघ न्यूझीलंड अ संघाविरुद्ध 3 वनडे आणि 2 चार दिवसीय कसोटी सामने खेळणार आहे. वनडे सामन्यांची मालिका 22 जानेवारीपासून सुरु होणार आहे. त्यानंतर 30 जानेवारीपासून चार दिवसीय कसोटी सामन्यांची मालिका सुरु होईल.
विशेष म्हणजे भारत अ संघापाठोपाठ भारताचा वरिष्ठ संघही न्यूझीलंड दौरा करणार आहे. भारत अ संघाचा न्यूझीलंड दौरा 10 फेब्रुवारीला संपणार आहे. त्यानंतर 11 दिवसांनी म्हणजेच 21 फेब्रुवारीपासून भारतीय वरिष्ठ संघाची न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिका सुरु होणार आहे. त्यामुळे भारताच्या वरिष्ठ कसोटी संघात पुनरागमन करण्याचा शॉचा प्रयत्न असणार आहे.
भारतीय वरिष्ठ संघ कसोटी मालिका खेळण्याआधी न्यूझीलंड दौऱ्यात 24 जानेवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान 5 टी20 आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे.
संपूर्ण यादी – आयसीसीकडून सर्वोत्तम कसोटीपटू म्हणून सन्मानित झालेले क्रिकेटपटू
वाचा????https://t.co/dafpGh08x1????#म #मराठी #Cricket #TeamIndia #ICCAwards @patcummins30— Maha Sports (@Maha_Sports) January 15, 2020
या ३ भारतीयांना मिळाले आहेत आयसीसी सर्वोत्कृष्ट वनडे क्रिकेटपटूचे पुरस्कार
वाचा????https://t.co/9aguvAkA6T????#म #मराठी #Cricket #TeamIndia #ICCAwards @ImRo45— Maha Sports (@Maha_Sports) January 15, 2020






