श्रीलंका संघाविरुद्ध एकदिवसीय मालिकेत उत्कृष्ट प्रदर्शन करणारा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. श्रीलंका संघाविरुद्ध सुरू असलेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेमध्ये पृथ्वी शॉ खूप व्यस्त आहे. परंतु याच दरम्यान त्याने आपल्या कथित प्रेयसी प्राची सिंगला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन सर्व चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिलेला आहे.
पृथ्वीने प्राचीला मध्यरात्री वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर चाहत्यांमध्ये त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे. इतकेच नव्हे तर, त्याचवेळी काही चाहते ट्विटरच्या माध्यमातून पृथ्वी शॉच्या लेडी लकबद्दल बोलत आहेत.
पृथ्वी शॉने मध्यरात्री दोन वाजता आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून स्टोरीच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. इतकेच नव्हे तर, त्याने स्टोरीला प्राची सिंगचे कोलाज करून फोटो पोस्ट केले होते आणि लिहिले की, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा.’ याच्या व्यतिरिक्त त्याने दोन मजेशीर ईमोजीसह इंस्टाग्राम अकाउंटवर तिला मेंशन केले आहे. पृथ्वी शॉच्या या पोस्टनंतर प्राचीच्या उत्तराची सर्वांना उत्सुकता होती. त्यासाठी चाहत्यांना जास्त वाटही पाहावी लागली नाही. प्राचीने देखील लगेच शॉला उत्तर दिले.
पृथ्वी शॉने केलेल्या पोस्टला उत्तर देत तिने जास्त काही लिहिले नाही. फक्त स्टोरी रीपोस्ट केली आणि लिहिले की, “थँक यू”. या दोघांच्या सोशल मीडियावरील संभाषणाला पाहून चाहत्यांना असा अंदाज येत आहे की, या दोघांमध्ये नक्की काहीतरी आहे. परंतु या दोघांनीही अजून अधिकृतपणे या गोष्टीचा स्वीकार केलेला नाही.
सध्या पृथ्वी शॉ भारताच्या मर्यादित षटकांच्या संघासोबत श्रीलंका दौऱ्यावर आहे. श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाला तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेनंतर आता तीन टी20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या सामन्यात पृथ्वी शॉने 43 धावा केल्या होत्या. दुसऱ्या सामन्यात त्याला चांगली कामगिरी करता आली नाही व तो या धावा 13 धावा करत बाद झाला. तर तिसर्या आणि शेवटच्या सामन्यात पृथ्वी शॉने सर्वाधिक 49 धावा केल्या होत्या. याच फॉर्मसह तो येत्या टी20 मालिकेतही उत्कृष्ट प्रदर्शन करेल अशी अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अरेरे… ‘कोहली’ अतिशय दुर्देवीपणे धावबाद; गल्ली क्रिकेटमध्येही असा रनआऊट पाहिला नसेल!
सूर्यकुमारच्या विकेटच्या निर्णयावरुन तिसरे पंच पेचात, भारतीय दिग्गजाने ‘असे’ केले ट्रोल
तिसऱ्या वनडेत श्रीलंकेची भारतावर मात, तब्बल ‘इतक्या’ वर्षांनंतर मायदेशी झळकावली विजयी पताका