आयपीएल २०२०ला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार असल्याचे आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता चाहते पुन्हा एकदा आयपीएलचा आनंद लुटण्याच्या प्रतिक्षेत आहेत. यावेळी आयपीएलमध्ये युवा खेळाडूंवरही प्रत्यकाचे लक्ष असेल. विशेषत: १९ वर्षांखालील भारतीय संघाचा कर्णधार राहिलेला प्रियम गर्ग यावरही असेल.
१९ वर्षांखालील विश्वचषकात केली नाही अपेक्षित कामगिरी
गर्ग १९ वर्षांखालील विश्वचषकात अपेक्षित कामगिरी करू शकला नव्हता. या युवा फलंदाजाने विश्वचषकात २२.६६ च्या सरासरीने केवळ ६८ धावा केल्या होत्या. १९ वर्षांखालील विश्वचषकात चांगली कामगिरी न करूनही आयपीएल लिलावात सनरायझर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) संघाने त्याच्या प्रतिभेवर विश्वास ठेवला आणि त्याला १.९० कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात सामील केले. विशेष म्हणजे गर्गने (Priyam Garg) प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये द्विशतक आणि अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये शतक ठोकण्याचा कारनामा केला आहे.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये गर्गने आतापर्यंत १२ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ६६.६९ च्या सरासरीने ८६७ धावा केल्या आहेत. यामध्ये २ शतके आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये १९ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ४७.१३ च्या सरासरीने ७०७ धावा केल्या आहेत. त्यात २ शतके आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त ट्वेंटी२० क्रिकेटमध्ये त्याने ११ सामने खेळले आहेत. त्यात त्याने १३२.७४ च्या स्ट्राईक रेटने २२७ धावा केल्या आहेत. त्यात २ अर्धशतकांचा समावेश आहे.
शाहिद आफ्रिदीला पाकिस्तान सुपर लीगमध्ये मिळतात ५४ लाख ते ७४ लाख रूपये
भारतात आयपीएल (IPL), तर पाकिस्तानमध्ये पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League) खेळली जाते. पाकिस्तानच्या वेबसाईटनुसार, पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला (Shahid Afridi) पीएसएल २०२० मध्ये डायमंड गटात ठेवले आहे. ज्यामध्ये त्याला ५४ लाख ते ७७ लाख रुपये दिले जातात.
अशामध्ये भारतीय संघाचा युवा फलंदाज प्रियम गर्ग आयपीएल २०२०मध्ये आफ्रिदीपेक्षा ३ पटीने अधिक कमाई करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-काॅफीही नशीबात नाही, कसोटी खेळत असलेल्या इंग्लंडच्या क्रिकेटरने व्यक्त केली खंत
-धोनीला गौतमने दिला ‘गंभीर’सल्ला; जोपर्यंत आहे फिट तोपर्यंत…
-अखेर १६ वर्षांनंतर मोहम्मद कैफने ‘त्या’ चुकीसाठी मागितली संघसहकाऱ्याची माफी
ट्रेंडिंग लेख-
-टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ३- गब्बरची कसोटी क्रिकेटमध्ये जबर एन्ट्री
-अगदी सौरव तिवारीपासून ‘या’ ६ कर्णधारांच्या अंडर खेळलाय धोनी
-निराशाजनक! पदार्पणाच्या वनडे सामन्यातच नर्वस नाइंटिजचे शिकार झालेले ५ क्रिकेटपटू





