पुढीलवर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या 19 वर्षांखालील विश्वचषकासाठी आज(2 डिसेंबर) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या विश्वचषकात 19 वर्षांखालील भारतीय संघाचे नेतृत्व उत्तर प्रदेशचा प्रियम गर्ग सांभाळणार आहे.
तसेच या संघाचे उपकर्णधारपद ध्रुव चंद जुरेलकडे सोपवण्यात आले आहे. तो यष्टीरक्षणाचीही जबाबदारी सांभाळेल. तसेच कुमार कुशग्राचाही यष्टीरक्षक म्हणून भारताच्या संघात समावेश करण्यात आला आहे.
त्याचबरोबर मुंबईच्या यशस्वी जयस्वालबरोबरच दिव्यांश सक्सेना, शाश्वत रावत, तिळक वर्मा अशा फलंदाजांचा भारताच्या संघात समावेश आहे.
गोलंदाजांमध्ये सुशांत मिश्रा, विद्याधर पाटील, कार्तिक त्यागी, अथर्व अंकोलेकर, शुभांग हेगडे आणि रवी बिश्नोई यांचा भारताच्या संघात समावेश आहे.
हा विश्वचषक पुढील वर्षी 17 जानेवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान पार पडणार आहे. या विश्वचषकासाठी भारताचा अ गटात समावेश आहे. ह्या गटात जपान, न्यूझीलंड आणि श्रीलंका या संघांचाही समावेश आहे. ह्या स्पर्धेत एकूण 16 देशांचे संघ सहभागी होणार आहेत.
भारतीय संघ 19 वर्षांखालील विश्वचषकाचा गतविजेता आहे. भारताने आत्तापर्यंत 2000, 2008, 2012 आणि 2018 असे एकूण 4 वेळ 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकला आहे.
https://twitter.com/BCCI/status/1201350396427395077
19 वर्षांखालील विश्वचषक 2020 साठी असा आहे भारतीय संघ –
प्रियम गर्ग (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, टिळक वर्मा, दिव्यांश सक्सेना, ध्रुव चंद जुरेल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), शाश्वत रावत, दिव्यांश जोशी, शुभांग हेगडे, रवीं बिश्नोई, आकाश सिंग, कार्तिक त्यागी, अथर्व अंकोलेकर, कुमार कुशग्रा (यष्टीरक्षक), सुशांत मिश्रा, विद्याधर पाटील.






