मार्च महिन्यात क्रिकेट चाहत्यांना महिला विश्वचषक (Women’s World Cup) पाहायला मिळणार आहे. ४ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान न्यूझीलंडमध्ये महिला विश्वचषक खेळला जाणार आहे. या विश्वचषकातील सामने न्यूझीलंडमधील ६ वेगवेगळ्या ठिकाणी एकूण ८ संघांमध्ये होणार आहे. या आठही संघात आयसीसी बक्षीस रक्कमचे वाटप करणार आहे. दरम्या यावेळी मागच्यावेळीपेक्षा ५० टक्क्याने अधिक बक्षीस रक्कम (Prize Money) विजेत्या संघाला मिळणार आहे.
या विश्वचषकाच्या मुख्य स्पर्धेत यजमान न्यूझीलंडसह भारत, वेस्ट इंडिज, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि पाकिस्तान या ८ देशांचे महिला संघ सहभागी होणार आहेत. या ८ संघात राऊंड-रॉबिन पद्धतीने सामने खेळले जातील. यातून अव्वल ४ संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.
विजेत्या संघाच्या बक्षीस रकमेत वाढ
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) विजेत्या संघाला मिळणाऱ्या बक्षीस रकमेच गेल्यावेळीपेक्षा ५० टक्क्याने वाढ केली आहे. यावेळी विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला १.३२ मिलियन डॉलर म्हणजेत साधारण ९.९० कोटी रुपये मिळतील. ही रक्कम गेल्यावेळीपेक्षा दुप्पट आहे. तसेच उपविजेत्या संघाला ६ लाख अमेरिकन डॉलर म्हणजेच साधारण ४.५० कोटी रुपये मिळतील.
तसेच उपांत्यफेरीत पराभूत होणाऱ्या दोन संघाला प्रत्येकी ३ लाख अमेरिकन डॉलर म्हणजेच साधारण २.२५ कोटी रुपये मिळतील, तर साखळी फेरीतून बाहेर होणाऱ्या ४ संघांना ७० हजार अमेरिकन डॉलर म्हणजेच ५२.५५ लाख रुपये बक्षीस रक्कम असणार आहे. यातील साखळी फेरीत सामन्यातील प्रत्येक विजेत्या संघाला २५ हजार डॉलर बक्षीस मिळणार आहे.
यंदाच्या विश्वचषकासाठी एकूण बक्षीस रक्कम 3.5 मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच २६.२७ कोटी रुपये असणार आहे. ही रक्कम गेल्यावेळीपेक्षा ११.२६ कोटींनी जास्त आहे.
भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध
महिला विश्वचषक २०२२ स्पर्धेतील पहिला सामना ४ मार्चला यजमान न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज संघात खेळवला जाईल. या सामन्यापासून स्पर्धेला सुरुवात होईल. भारतीय महिला संघ या स्पर्धेतील पहिला सामना ६ मार्च रोजी तौरंगा येखे पाकिस्तानविरुद्ध खेळेल. त्यानंतर भारताला न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका या संघांविरुद्ध सामने खेळायचे आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘जोपर्यंत १००-२०० चेंडू तो खेळत नाही, तोपर्यंत त्याला झोप येत नाही’, मोहम्मद शमीचा खुलासा
श्रीसंतला गंभीर दुखापत! थेट हॉस्पिटलमधून शेअर केला फोटो
रशियाच्या हल्ल्यावेळी यूक्रेनमध्ये होते पीटरसनचे कुटुंबीय, मग त्यांचे पुढे काय झाले? वाचा सर्वकाही