ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकाची समाप्ती रविवारी (13 नोव्हेंबर) होईल. मेलबर्न येथील मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर इंग्लंड आणि पाकिस्तान हे संघ अंतिम सामन्यात समोरासमोर येतील. दोन्ही संघांना दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याची संधी असेल. या अंतिम सामन्यात विजेता होणारा संघ कोट्याधीश होईल. आज आपण या स्पर्धेत एकूण किती बक्षीस रक्कम दिली जाणार आहे याबाबत जाणून घेऊया.
ऑस्ट्रेलियात प्रथमच आयोजित होत असलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी सर्व क्रिकेटजगत उत्सुक आहेत. विश्वचषक ट्रॉफीसह विजेत्या खेळाडूला 13.5 कोटी रुपयांचे बक्षीस मिळेल. या बक्षीसावरही दोन्ही संघांची नजर असणार आहेत. या स्पर्धेत एकूण 45.68 कोटी रुपयांची बक्षीसे देण्यात येतील. मागील विश्वचषकातही इतक्याच रकमेची बक्षीसे दिली गेली होती.
अंतिम सामन्यात पराभूत झालेल्या संघाला विजेता संघापेक्षा जवळपास अर्धी रक्कम मिळेल. उपविजेता संघ आपल्या सोबत 6.52 कोटी इतकी रक्कम घेऊन जाईल. विश्वचषकातील प्रवास उपांत्य फेरीतच संपलेल्या भारत व न्यूझीलंड या संघांना प्रत्येकी साडे तीन कोटी रुपये मिळतील.
टी20 विश्वचषकात मिळणारी ही रक्कम जगभरातील इतर लीगच्या मानाने अत्यंत नगण्य आहे. जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या विजेत्याला विश्वचषक विजेत्यापेक्षा अधिक रक्कम दिली जाते. आयपीएल विजेत्याला मागील तीन वर्षांपासून 20 कोटी इतकी रक्कम दिली जात आहे. 2019 मध्ये वनडे विश्वचषक जिंकलेल्या इंग्लंड संघाला 27.46 कोटी इतकी रक्कम दिली गेली होती. अवघ्या काही दिवसांमध्ये कतार येथे सुरू होत असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत विजेता होणारा संघ तब्बल 319 कोटी इतकी रक्कम आपल्या घरी घेऊन जाईल. एनबीए, प्रीमियर लीग अशा इतर खेळांच्या लीगमध्ये देखील शेकडो कोटींची बक्षिसे दिली जातात.
(Prize Money For ICc T20 World Cup 2022)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सेमी-फायनलमधील पराभवानंतर अशी होती टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधील परिस्थिती
उमरान मलिक न्यूझीलंडमध्ये आपल्या वेगाने कहर करायला सज्ज, फिटनेस व्हिडिओ व्हायरल