---Advertisement---

प्रो कबड्डी २०२१: ‘बंगळुरू बुल्स’ने उघडले विजयाचे खाते, ‘तमिल थलाईवाज’ला ३८-३० ने पाजले पराभवाचे पाणी

On: शुक्रवार, डिसेंबर 24, 2021 9:42 PM
Tamil And Bengluru kabaddi
---Advertisement---

प्रो कबड्डी लीग २०२१ला काही दिवसांपूर्वीच धमाक्यात सुरुवात झाली आहे. प्रो कबड्डीचा यंदाचा हा ८ वा हंगाम आहे. हंगामाच्या तिसऱ्या दिवशी (२४ डिसेंबर) पहिला सामना हा ‘तमिल थलाईवाज’ आणि ‘बंगळुरू बुल्स’ संघात झाला. बंगळुरू बुल्सने ३८-३० च्या फरकाने या सामन्यात बाजी मारली आहे. यासह त्यांनी हंगामातील त्यांचे विजयाचे खातेही उघडले आहे.

हेही वाचा- प्रो कबड्डी २०२१ : ‘दबंग दिल्ली’ ठरली ‘यू मुंबा’वर भारी, जोरदार पुनरागमनासह ३१-२७ ने जिंकला सामना

दबंग दिल्लीचा शानदार विजय

तत्पूर्वी यू मुंबा विरुद्ध दबंग दिल्ली, या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सामन्यातील पहिल्या हाफमध्ये यू मुंबाने दबंग दिल्लीवर आघाडी घेतली होती. ते १२-१० ने सामन्यात पुढे होते. मात्र पुढे दबंग दिल्लीच्या कबड्डीपटूंनी सामन्यात जोरदार पुनरागमन केले आणि प्रतिस्पर्धांच्या मनोबल खच्ची करायला सुरुवात केली. परिणामी सामना दबंग दिल्लीच्या बाजूने वळला आणि त्यांनी ३१-२७ च्या फरकाने सामन्यात बाजी मारली आहे. हा त्यांचा यंदाच्या हंगामातील दुसरा विजय आहे.

महत्वाच्या बातम्या :

अविष्का फर्नांडोचा ‘फायनल धमाका’! जाफना किंग्स सलग दुसऱ्यांदा लंका प्रीमियर लीगचे ‘चॅम्पियन’

भारत-दक्षिण आफ्रिका क्रिकेट संबंधांना तीन दशके पूर्ण; दोन्ही बोर्ड करतायेत खास तयारी

हे नक्की पाहा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---