Pro Kabaddi 10: बुधवारी (दि. 6 डिसेंबर) अहमदाबाद येथे प्रो कबड्डी 10 लीगमधील आठवा सामना तेलुगू टायटन्स विरुद्ध पटना पायरेट्स संघात पार पडला. या सामन्यात पटनाने टायटन्सला 50-28ने पराभूत केले. तसेच, शानदार विजयासह स्पर्धेची जबरदस्त सुरुवात केली. या सामन्यात तेलुगू टायटन्स संघाचा कर्णधार पवन सेहरावत याने पीकेएल स्पर्धेतील 1000 रेड पॉईंट्स मिळवण्याचा जबरदस्त विक्रम आपल्या नावावर केला. मात्र, त्याची ही ऐतिहासिक कामगिरी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.
प्रो कबड्डी 2023 (Pro Kabaddi 2023) स्पर्धेतील आठव्या सामन्यात पटना पायरेट्स (Patna Pirates) संघाच्या सचिनने सर्वाधिक 14 रेड पॉईंट्स मिळवले. तसेच, डिफेन्समध्ये अष्टपैलू अंकितने शानदार प्रदर्शन करत 5 टॅकल पॉईंट्स नावावर केले. तेलुगू टायटन्स (Telugu Titans) संघाचा कर्णधार पवन सेहरावत (Pawan Sehrawat) याने सामन्यात 11 पॉईंट्स मिळवले, पण त्याच्या सलग दुसऱ्या सुपर 10 नंतरही संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
तेलुगूचा सलग दुसरा पराभव
पहिल्या हाफमध्ये पवनने पहिल्या 2 यशस्वी रेड केल्या. त्यानंतर सुपर रेड करत त्याने पीकेएल स्पर्धेतील आपले 1000 रेड पॉईंट्स (Pawan Sehrawat PKL 1000 Raid Points) पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो एकूण पाचवा खेळाडू बनला. मात्र, सुरुवातीला पिछाडीवर पडल्यानंतर पटनाने सामन्यात शानदार पुनरागमन करत पहिल्या ब्रेकनंतर 13व्या मिनिटाला तेलुगू संघाला सर्वबाद करत आघाडी घेतली. यानंतर पहिला हाफ संपण्यापूर्वी त्यांनी 19व्या मिनिटाला पुन्हा एकदा पटना संघाने तुेलुगू संघाला सर्वबाद केले आणि तेव्हा त्यांची आघाडी एकतर्फी झाली होती.
पहिल्या हाफनंतर पटना संघ सामन्यात 28-16ने आघाडीवर होता. सचिनने रेडिंगमध्ये सर्वाधिक 9 पॉईंट्स घेतले होते. डिफेन्समध्ये पटनाकडून अंकितने शानदार प्रदर्शन करत पहिल्या हाफमध्ये 3 टॅकल पॉईंट्स मिळवले. तेलुगू टायटन्सकडून पहिल्या हाफमध्ये पवनने सर्वाधिक 7 रेड पॉईंट् घेतले. मात्र, त्याच्या 5 अयशस्वी रेडमुळे संघाला नुकसान झाले.
दुसरा हाफ सुरू झाल्यानंतर लगेच सचिनने आपला सुपर 10 पूर्ण केला, पण पुढच्याच रेडमध्ये तो बाहेरही गेला. मात्र, पटना पायरेट्सने आपली आघाडी मजबूत केली आणि 30व्या मिनिटाला त्यांची आघाडी वाढून 36-25 झाली होती. यादरम्यान अंकितने डिफेन्समध्ये आपला हाय 5 पूर्ण केला, तर पवननेही आपला सुपर 10 पूर्ण केला.
सामन्यातील 34व्या मिनिटाला तेलुगू टायटन्स संघ सामन्यात तिसऱ्यांदा सर्वबाद झाला आणि इथून 42-27च्या स्कोरसह पटना पायरेटन्सने सामना पूर्णपणे आपल्या बाजूने केला. यानंतर तेलुगू टायटन्स संघ फक्त एक पॉईंट घेऊ शकला आणि पटनाने अंतिम क्षणात आपला स्कोर 50पर्यंत पोहोचवला. अशाप्रकारे हा सामना पटनाने 50-28च्या मोठ्या फरकाने खिशात घातला. (pro kabaddi 2023 telugu titans vs patna pirates 8th match pawan sehrawat read here)
हेही वाचा-
Pro Kabaddi 10: मनिंदरच्या अफलातून प्रदर्शनाने बंगालचा रोमांचक विजय, बेंगळुरू बुल्सचा सलग दुसरा पराभव
PKL 10: अस्लमच्या नेतृत्वाखाली पुणेरी पलटणचा दणदणीत विजय, गतविजेत्या पँथर्सला 37-33ने चारली पराभवाची धूळ