प्रो कबड्डी (Pro Kabaddi 2022) लीगच्या नवव्या हंगामात शनिवारी (22 ऑक्टोबर) तीन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात यु मुंबाने अतिशय धसमुसळा खेळ दाखवत पराभव पत्करला. दुसऱ्या सामन्यातही जयपूर पिंक पँथर्सने तेलगू टायटन्सला पूर्णपणे निष्प्रभ करत आपला विजयरथ कायम ठेवला. तर अखेरच्या सामन्यात गुजरात जायंट्सने रोमांचक सामन्यात हरियाणा स्टीलर्सचा पराभव करत पुन्हा एकदा विजयी रस्ता धरला.
सलग विजय मिळवून या सामन्यात उतरलेल्या बेंगलोर बुल्स व यु मुंबा या संघांमधील दिवसातील पहिला सामना चांगलाच रंगला. मुंबईने अतिशय आक्रमक सुरुवात करत सुरुवातीला आघाडी घेतली. गुमान सिंगने आपला रेडींग फॉर्म कायम राखला व 9 गुण कमावले. पहिल्या हाफच्या अखेरीस मुंबईकडे 15 गुणांची चांगली आघाडी होती. दुसरा हाफ सुरू झाल्यानंतर मात्र आपल्या घरच्या मैदानावर खेळत असलेला बेंगलोर संघ अतिशय वेगळा दिसला. भरत हुडा याने रेडींगची जबाबदारी घेत मुंबईला दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला ऑल आउट केले. पुढील चार मिनिटात त्यांनी पुन्हा एकदा मुंबईला ऑल आऊट करत सामन्यात बरोबरी साधली. या सलग दुसऱ्या ऑल आउटने मुंबईचा संघ पुरता हतबल झाला. बेंगलोरने आपला दबदबा अखेरपर्यंत कायम राखत 42-32 असा मोठा विजय मिळवला. भरत हुडाने कारकीर्द येथील सर्वोत्तम खेळ करत 16 गुण मिळवले.
The Bulls charge into the 🔝 3️⃣ on the points table
Describe the finish to the match in 3️⃣ words#vivoProKabaddi #FantasticPanga #MUMvBLR pic.twitter.com/fezHzM69sm
— ProKabaddi (@ProKabaddi) October 22, 2022
दिवसातील दुसऱ्या सामन्यातही अशाच प्रकारे एकतर्फी लढत पाहायला मिळाली. जयपुर पिंक पँथर्सने शानदार आक्रमक खेळ करत तेलगू टायटन्सविरुद्ध 7-0 अशी सुरुवात केली. जयपूरच्या राहुल चौधरी व अर्जुन देशवाल या रेडर्सना साहूल कुमारने दिलेल्या साथीमुळे जयपुरने पहिल्या हाफच्या शेवटी 29-10 अशी भली मोठी आघाडी मिळवली होती. दुसऱ्या हाफमध्ये देखील जयपुरने आपला हाच धडाकेबाज खेळ कायम ठेवला. त्यांनी तेलगूला निष्प्रभ करत 51-27 असा विजय संपादन केला.
𝐆𝐚𝐫𝐚𝐣 𝐤𝐢 𝐠𝐨𝐨𝐧𝐣 ft. Gujarat Giants 🔥
They beat Haryana Steelers in an epic showdown to end Saturday's #TriplePanga ⚔️#vivoProKabaddi #FantasticPanga #HSvGG pic.twitter.com/4531ogUWdz
— ProKabaddi (@ProKabaddi) October 22, 2022
.@JaipurPanthers put on a masterclass and dominate @Telugu_Titans 🔥🔥#vivoProKabaddi #FantasticPanga #JPPvTT pic.twitter.com/U6xvOlWzF5
— ProKabaddi (@ProKabaddi) October 22, 2022
दिवसातील तिसऱ्या सामन्यात गुजरात जायंट्स व हरियाणा स्टीलर्स यांच्या दरम्यान रोमांचक लढत झाली. सुरुवातीला हरियाणा स्टीलर्सने वेगवान खेळ दाखवत पहिल्या सत्राच्या अखेरीस 5 गुणांची आघाडी मिळवली होती. दुसऱ्या हाफमध्ये मीतूने तसाच खेळ कायम ठेवत 16 गुण कमावले. मात्र, गुजरातसाठी राकेशने 18 गुण मिळवत संघाला 42-38 असा विजय मिळवून दिला.