प्रो कबड्डी लीग २०२१-२०२२ च्या शनिवारी (८ जानेवारी) झालेल्या ‘ट्रिपल पंगा’ सामन्यांतील अखेरच्या सामन्यात तीन वेळचे विजेता पटना पायरेट्स व गुजरात जायंट्स आमने सामने आले. अत्यंत रोमहर्षक झालेल्या सामन्यात पटना पायरेट्सने २७-२६ असा विजय मिळवला
सामन्याच्या सुरुवातीपासून पटनाने वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. चार मिनिटात त्यांनी गुजरातला ऑल आउटकडे ढकलले. मात्र, गुजरातचा इराणीयन अष्टपैलू हादी ओस्तरोक याने प्रथम रेडींगमध्ये व त्यानंतर डिफेन्स मध्ये गुण घेत ऑल आउट टाळण्याचा प्रयत्न केला. पहिल्या हाफच्या अखेरीस पटनाला गुजरात संघाला ऑल आऊट करण्यात यश आले. पहिला हाफच्या शेवटी पटना संघ १५-१३ असा आघाडीवर होता.
दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला गुजरातने तीन गुण घेत आघाडी घेतली. मात्र, त्यानंतर गुजरातने काहीसा धसमुसळा खेळ केला. त्याचाच फायदा घेत पटनाने गुजरातला ऑल आउट केले. मोनू गोयत, सचिन व प्रशांत कुमार यांनी रेडींग तर रेझा व सज्जाद यांनी डिफेन्समध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले.






