---Advertisement---

कोलकाताला पंजाबविरुद्ध सूर गवसणार? ‘अशी’ असेल राहुल-मॉर्गनच्या संघांची प्लेइंग इलेव्हन

On: सोमवार, एप्रिल 26, 2021 4:36 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा एकविसावा सामना आज (२६ एप्रिल) पंजाब किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे.

मागील सामन्यात बलाढ्य मुंबई इंडियन्सला ९ विकेट्सने पराभवाची धूळ चारल्याने पंजाबचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला असावा. अशात या सामन्यातही विजयी घोडदौड कायम राखत गुणतालिकेत चौथ्या स्थानावर ताबा मिळवण्याचा त्यांचा इरादा असेल. दुसरीकडे पराभवाचा चौकार करणाऱ्या कोलकाता संघाला हंगामातील दुसऱ्या विजयाची आस असेल. अशात हे दोन्ही संघ तगड्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानावर उतरु शकतात.

तब्बल १४ कोटींची किंमत मोज संघात सहभागी केलेला ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसन संघाच्या अपेक्षांवर खरा उतरु शकलेला नाही. तरीही पंजाबचा संघनायक केएल राहुल त्याला संधी देऊ शकतो. जर रिचर्डसनची निवड नाही करण्यात आली, तर त्याच्याजागी ख्रिस जॉर्डनचे खेळणे जवळपास ठरल्यात जमा आहे.

तर कोलकाता संघ या सामन्यात आपल्या फलंदाजीवर अधिक भर देण्याचा प्रयत्न करेल. कोलकाताचा कर्णधार ऑयन मॉर्गनला आतापर्यंत मोठी खेळी करता आलेली नाही. त्यामुळे तो या सामन्यात ती कसर भरुन काढताना दिसेल. याबरोबरच संघाचा अनुभवी गोलंदाज सुनिल नारायणकडूनही संघाला मोठ्या अपेक्षा असणार आहेत.

पंजाब किंग्‍सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –
केएल राहुल (कर्णधार), मयंक अगरवाल, ख्रिस गेल, निकोलस पूरन, दीपक हूडा, शाहरुख खान, मोसेस हेनरिक्‍स, झाय रिचर्डसन/ख्रिस जॉर्डन, रवि बिश्‍नोई, मोहम्‍मद शमी, अर्शदीप सिंह

कोलकाता नाईट राइडर्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –
नितिश राणा, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, ऑयन मोर्गन (कर्णधार), आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, सुनील नरेन, पॅट कमिन्स, शिवम मावी, प्रसिद्ध कृष्‍णा, वरुण चक्रवर्ती

महत्त्वाच्या बातम्या-

SRHच्या गोलंदाजाने मारला अप्रतिम सिक्सर, DCची बॉलिंग बघून लोटपोट झाली ‘मिस्ट्री गर्ल’; पाहा Video

“अब हिंदी में नही बोल सकता”, धोनीचा यष्टीमागील संवाद स्टंप माइकमध्ये कैद; पाहा भारी व्हिडिओ

सूर्यकुमारला रिलीज करणे केकेआरची गेल्या १२ वर्षांतील सर्वात मोठी चूक, माजी कर्णधाराने साधला निशाणा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---