---Advertisement---

दोन नवे कर्णधार आज आमने सामने; ‘अशी’ असेल दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्सची प्लेइंग XI

---Advertisement---

गुरुवार रोजी (१५ एप्रिल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएल २०२१ चा सातवा सामना रंगणार आहे. वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे संध्याकाळी ७.३० वाजता या सामन्याची सुरुवात होणार आहे.

नवनियुक्त कर्णधार संजू सॅमसनच्या नेतृत्त्वाखालील राजस्थान संघ पंजाब किंग्जविरुद्ध ४ धावांनी हंगामातील आपली पहिली लढत जिंकण्यात अपयशी ठरला होता. त्यामुळे हा सामना जिंकत पहिला विजय साजरा करण्यास राजस्थान उस्तुक असणार आहे. दुसरीकडे नवा कर्णधार रिषभ पंतच्या नेतृत्त्वाखाली दिल्लीने विजयासह हंगामाचा शुभारंभ केला होता. बलाढ्य चेन्नई सुपर किंग्जला त्यांनी ७ विकेट्सने पराभवाची धूळ चारली होती. त्यामुळे दिल्ली संघ आपली विजयी लय कायम राखण्यासाठी प्रयत्न करताना दिसेल.

राजस्थान संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्स दुखापतीमुळे पूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. त्यामुळे लियाम लिविंगस्टोन किंवा डेविड मिलर यांच्यापैकी एकाला त्याच्याजागी अंतिम ११ जणांमध्ये स्थान दिले जाऊ शकते. उर्वरित संघ मागील सामन्याप्रमाणे असू शकतो.

दुसरीकडे दिल्लीने तगड्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरत हंगामातील पहिलाच सामना एकहाती जिंकला होता. त्यामुळे त्यांच्या अंतिम ११ जणांच्या पथकात बदल होण्याची क्षमता फार कमी आहे. दिल्लीचा वेगवान गोलंदाज एन्रिच नॉर्किए कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे तो या सामन्यातही खेळताना दिसणार नाही.

राजस्थान रॉयल्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –
जोस बटलर, मनन वोहरा, संजू सॅमसन (कर्णधार), लियाम लिविंगस्‍टोन/डेविड मिलर, शिवम दुबे, रियान पराग, राहुल तेवतिया, क्रिस मॉरिस, श्रेयस गोपाल, चेतन सकारिया, मुस्‍ताफिजुर रहमान

दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन – 
पृथ्‍वी शॉ, शिखर धवन, रिषभ पंत (कर्णधार), मार्कस स्‍टॉयनिस, शिमरॉन हेटमायर, अजिंक्‍य रहाणे, क्रिस वोक्‍स, आर अश्विन, टॉम करन, अमित मिश्रा, आवेश खान

महत्त्वाच्या बातम्या-

आश्चर्यच आहे! आयपीएल इतिहासात आरसीबीने ‘एवढ्या’ वर्षानंतर केला १५० पेक्षा कमी धावांचा बचाव

“म्हणून हार्दिक, सूर्यकुमार, ईशान हे मनिष पांडेच्या पुढे निघून गेले”, माजी क्रिकेटपटू बरसला

हैदराबादच्या धाकड फलंदाजांविरुद्ध ‘अशी’ होती किंग कोहलीची रणनिती, शाहबाजच्या रुपात वापरले ‘सिक्रेट पॅकेज’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---