संपुर्ण नाव- अनिल कुंबळे
जन्मतारिख- 17 ऑक्टोबर, 1970
जन्मस्थळ- बेंगळुरु, कर्नाटक
मुख्य संघ- भारत, आशिया एकादश, कर्नाटक, लीसेस्टरशायर, नॉर्थम्पटनशायर, रॉयल चॅलेंजर बेंगलोर, सरे
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज (लेगस्पिन)
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- इंग्लंड विरुद्ध भारत, तारिख- 9-14 ऑगस्ट, 1990
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध श्रीलंका, तारिख – 25 एप्रिल, 1990
आंतरराष्ट्रीय कसोटी सामने- 132, विकेट्स- 619, सर्वोत्तम कामगिरी- 10/74
आंतरराष्ट्रीय वनडे सामने- 271, विकेट्स- 337 , सर्वोत्तम कामगिरी- 6/12
थोडक्यात माहिती-
-कसोटी इतिहासात भारतीय संघाला गोलंदाज म्हणून अनिल कुंबळेने सर्वाधिक कसोटी सामने जिंकून दिले. त्यावेळी त्याच्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोलंदाजाला कसोटीत अशी कामगिरी करता आली नाही.
-कसोटी सामन्याच्या एका डावात दहा विकेट्स घेणारा कुंबळे भारताचा पहिला आणि जगातील दुसरा खेळाडू ठरला. ही कामगिरी त्याने 1999मध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात केली होती.
-2001मध्ये बेंगळुरु येथे इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात 300 विकेट्स घेणारा कुंबळे पहिला भारतीय फिरकीपटू ठरला होता.
-ऑगस्ट, 2007 मध्ये ओव्हल येथे कुंबळेने ग्लेन मॅकग्राच्या 563 विकेट्सच्या विक्रमाला मागे टाकले. त्यानंतर जानेवारी 2008 मध्ये त्याने 600 विकेट्सचाही टप्पा पार करत शेन वॉर्न आणि मुथैय्या मुरलीधरन यांच्यापाठोपाठ आपली जागा बनवली आणि तिसऱ्या क्रमांकावर आपले स्थान पक्के केले.
-सर्वाधिक वनडे आणि कसोटी विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज म्हणून कुंबळेला ओळखले जाते.
-आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही, कुंबळेचा क्रिकेटमध्ये सक्रिय राहिला.
-2010 मध्ये कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी कुंबळेची निवड झाली होती. त्यामध्ये त्याने 3 वर्षे कामकाज सांभाळले.
-विंडीजच्या कसोटी दौऱ्यापूर्वी 2016 मध्ये कुंबळेची भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली होती.
-कुंबळे सध्या आयपीएलमधील फ्रँचायझी संघ किंग्ज इलेव्हन पंजाबचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहे.