संपुर्ण नाव- फैझ याकूब फेझल
जन्मतारिख- 7 सप्टेंबर, 1985
जन्मस्थळ- नागपूर, महाराष्ट्र
मुख्य संघ- भारत, मध्य विभाग,भारत अ, इंडिया रेड, 19 वर्षांखालील भारतीय संघ, रेल्वेज, राजस्थान रॉयल्स आणि विदर्भ
फलंदाजीची शैली- डाव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध झिम्बाब्वे, तारिख – 15 जून, 2016, ठिकाण – हरारे
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 1, धावा- 55, शतके- 0
थोडक्यात माहिती-
-2003मध्ये फेझलने प्रथम श्रेणी आणि रणजी ट्रॉफीत पदार्पण करत 151 धावा केल्या होत्या. त्याच्या या धावांनी विदर्भ संघाला एका डावाच्या आघाडीवर 112 धावांनी हा सामना जिंकून दिला होता.
-वयाच्या 30व्या वर्षी फेझल विदर्भ संघाचा उपकर्णधार बनला होता. 2016मध्ये सुब्रमन्यम बद्रिनाथ हे विदर्भ संघाचे कर्णधार बनले.
-फेझलला 2004मध्ये अंबाती रायडूच्या नेतृत्वाखालील 19 वर्षांखालील भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी संघात शिखर धवन, रॉबिन उथप्पा, दिनेश कार्तिक आणि आरपी सिंग यांचा समावेश होता. मात्र सुरुवातीलाच त्याच्या अंगठ्याला दुखापत झाल्याने तो जास्त खेलू शकला नाही.
-2010 आणि 2011मध्ये फेझलने 12 सामने खेळत 18.30च्या सरासरीने 183 धावा केल्या होत्या. यात त्याच्या किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या 45 धावांचा समावेश होता.
-2010मध्ये इंमर्जिंग प्लेयर अवॉर्डसाठी फेझलची निवड झाली होती. यावेळी त्याने ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली 9 सामने खेळत 164 धावा केल्या होत्या.
-2012मध्ये फेझलने तरानाशी लग्न केले. त्याच्या लग्नाला बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर, प्रशांत वैद्य, भारतीय क्रिकेटपटू उमेश यादव आणि प्रितम गंधे उपस्थित होते. त्यांना रोझिना ही मुलगी आहे.
-फेझलने मुरली विजयसोबत मिळून 2016मध्ये देवधर ट्रॉफीत खेळताना भारत अ संघाला विजय मिळवून दिला होता. त्यांनी मिळून भारत ब विरुद्ध 286 धावांची भागिदारी रचली होती.
-2016मध्ये इराणी ट्रॉफीतही फेझलने शतकी खेली केली होती. शेष भारतीय संघाचा 2015-16 रणजी ट्रॉफी चॅम्पियन्स मुंबईविरुद्ध हा अंतिम सामना होता. यावेळी फेझलने 127 धावा करत शेष भारतीय संघाला 4 विकेट्सने विजय मिळवून दिला होता.
-2016च्या रणजी ट्रॉफी हंगामात फेझल विदर्भकडून सर्वाधिक धावा घेणारा खेळाडू ठरला होता. त्याने 8 सामने खेळत 39.92च्या सरासरीने 559 धावा केल्या होत्या.
-2016 साली इंग्लंडमधील दुर्हम काउंटीमध्ये हेटन लायन्सकडून खेळताना फेझलने 2 शतके ठोकली होती. यातील पहिले शतक त्याने व्हिटबर्न क्रिकेट क्लबविरुद्ध 101 चेंडूत केले होते. यात त्याच्या 13 चौकारांचा आणि 4 षटकारांचा समावेश होता. तर दुसरे शतक त्याने दक्षिण नॉर्थंबरलँड क्रिकेट क्लबविरुद्ध केले होते. त्याने 163 चेंडूत 108 धावा केल्या होत्या. यात त्याच्या एका षटकाराचा आणि 12 चौकारांचा समावेश होता.
-जून 2016मध्ये फेझलने त्याचा झिम्बाब्वेविरुद्ध वनडेत पदार्पण केले होते. तो त्याचा पहिला आणि शेवटचा सामना ठरला.