संपुर्ण नाव- मनिंदर सिंग
जन्मतारिख- 13 जून, 1965
जन्मस्थळ- पुणे, महाराष्ट्र
मुख्य संघ- भारत, दिल्ली आणि श्रॉपशायर
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- डाव्या हाताचे फिरकी गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध पाकिस्तान, तारिख – 23 ते 27 डिसेंबर, 1982, ठिकाण – कराची
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध पाकिस्तान, तारिख – 21 जानेवारी, 1983, ठिकाण – कराची
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 35, धावा- 99, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 35, विकेट्स- 88, सर्वोत्तम कामगिरी- 7/27
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 59, धावा- 49, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 59, विकेट्स- 66, सर्वोत्तम कामगिरी- 4/22
थोडक्यात माहिती-
-मनिंदर सिंग यांनी वयाच्या 17व्या वर्षी कसोटीत पदार्पण केले होते. ज्यामुळे ते कसोटीत पदार्पण करणारे सर्वात युवा क्रिकेटपटू ठरले होते. त्यांचा हा विक्रम सचिन तेंडूलकरने मोडला होता.
-जेव्हा सचिनने 1989 साली कसोटीत पदार्पण केले होते, तेव्हा मनिंदर हे भारतीय कसोटी संघाचा भाग होते. त्यावेळी सराव करताना सचिन फिरकी (लेगब्रेक) गोलंदाजी करत होता. त्याची गोलंदाजी शैली पाहून मनिंदर यांनी त्याला गोलंदाजीचा जास्त सराव करून त्यात पारंगत होण्याचा सल्ला दिला होता.
-मनिंदर हे डाव्या हाताचे फिरकी गोलंदाज होते. म्हणून त्याकाळात त्यांची बिशन सिंग बेदी यांच्याशी तुलना होणे अपरिहार्य होते. मात्र, त्यांच्यावरील अपेक्षांच्या ताणामुळे ते अजूनच खचत असायचे. तसेच ते सतत म्हणत असत की फिरकी गोलंदाज वयानुसार गोलंदाजीत पारंगत होत असतात. तरीही, त्यांच्यातील कमी आत्मविश्वासामुळे आणि कमी मार्गदर्शनामुळे त्यांनी वयाच्या 27व्या वर्षीच प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृ्ती घेतली होती.
-मनिंदर यांची आंतरराष्ट्रीय कारकिर्द कमी काळाची होती, तरीही त्यांनी बरेच विक्रम नोदंवले होते. त्यांनी वनडेत 3.95 च्या इकोनॉमी रेटने 50हून जास्त विकेट्स घेतल्या होत्या. कपिल देव यांच्यानंतर वनडेत इतक्या कमी इकोनॉमी रेटने कमीत कमी 50 विकेट्स घेणारे ते दुसरेच गोलंदाज ठरले होते.
-शिवाय 3.95 इतक्या कमी इकोनॉमी रेटने वनडेत 50हून जास्त विकेट्स घेणारे ते सर्वोत्कृष्ट डाव्या हाताचे गोलंदाज ठरले होते.
– 1987च्या विश्वचषकात मनिंदर यांचे मोठे योगदान लाभले होते. यावेळी त्यांनी 20च्या सरासरीने 14 विकेट्स घेतल्या होत्या. यासह विश्वचषकात त्यांनी एक नवा विक्रम नोंदवला होता. 4च्या इकोनॉमी रेटने कमीत कमी 10 विकेट्स घेणारे ते दुसरेच गोलंदाज ठरले होते.
-मनिंदर यांनी कसोटीत 38 डावात फलंदाजी करताना 99 धावा केल्या होत्या. यासह त्यांनी एक अनोखा विक्रमही आपल्या नावावर केला होता. तो असा की, कसोटीत सर्वाधिक डाव खेळूनही 100 धावा पूर्ण न करण्याचा विक्रम.
-मनिंदर यांची प्रथम श्रेणीतील फलंदाजी कामगिरी ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा चांगली होती. त्यांनी प्रथम श्रेणीत सुरुवातीला 107 सामन्यात 501 धावा केल्या होत्या. मात्र, पुढील 38 सामन्यात त्यांनी 886 धावा केल्या. यात 4 अर्धशतके आणि एका शतकाचा समावेश होता.
-क्रिकेटपटूसह ते पंच, प्रशिक्षक आणि समालोचकही आहेत.
-मनिंदर यांना व्यसनाचेही वेड होते. 2007 साली त्यांच्याकडे 1.5 ग्रॅम कोकेन सापडल्यामुळे त्यांना अटकही झाली होती. त्यानंतर त्यांनी खुलासा केला की, त्यांनी नेदरलॅंडमध्ये ड्रग घेण्याची सुरुवात केली होती.
-2007मधील त्यांच्या ड्रग प्रकरणामुळे त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला होता.