संपुर्ण नाव- प्रवीणकुमार सकट सिंग
जन्मतारिख- 2 ऑक्टोबर, 1986
जन्मस्थळ- मेरठ, उत्तर प्रदेश
मुख्य संघ- भारत, एअर इंडिया, गुजरात लायन्स, इंडिया रेड, किंग्स इलेव्हन पंजाब, मुंबई टी20, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, सनराइजर्स हैद्राबाद आणि उत्तर प्रदेश
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख – 20 ते 23 जून, 2011, ठिकाण – किंगस्टन
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध पाकिस्तान, तारिख – 18 नोव्हेंबर, 2007, ठिकाण – जयपूर
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 1 फेब्रुवारी, 2008, ठिकाण – मेलबर्न
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 6, धावा- 149, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 6, विकेट्स- 27, सर्वोत्तम कामगिरी- 5/106
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 68, धावा- 292, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 68, विकेट्स- 77, सर्वोत्तम कामगिरी- 4/31
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 10, धावा- 7, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 10, विकेट्स- 8, सर्वोत्तम कामगिरी- 2/14
थोडक्यात माहिती-
-प्रवीण कुमार हा शेतकरी कुंटुंबातील होता. त्याचे वडील फक्त शेकरी नव्हते, तर ते पोलिस हवालदारही होते. मात्र त्याला क्रिकटची आवड होती.
-लहानपणापासूनच कुमारला अनेकदा आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागले होते. त्याला 19 वर्षांखालील सामन्यांच्या सराव सामन्यात जायचे होते. पण त्यासाठी त्याला शूजची गरज असल्याने त्याने त्याची सायकल विकून शूज विकत घेतले होते, त्यावेळी त्याच्या आईनेही त्याला मदत केली होती.
-कुमारने 10त असताना क्रिकेट खेळण्यासाठी त्याच्या शेवटच्या परिक्षेपुर्वीची परिक्षा बुडवली होती. मात्र त्याच्या भावाने त्याला घरच्यांना ही गोष्ट कळू नये यासाठी मदत केली होती.
-2007 साली कुमार एनकेपी साळवे चॅलेंजर ट्रॉफीत पहिल्या 2 सामन्यात 9 विकेट्स आणि 89 धावा घेत निवडकर्त्यांच्या नजरेत आला होता. पुढे पाकिस्तानविरुद्धच्या 2007मधील वनडे सामन्यात त्याला पदार्पणाची संधी मिळाली.
-पुढे कुमारला 2007 सालच्या कॉमनवेल्थ बँक तिरंगी मालिकेमध्ये खेळण्याची संधी मिळाली. यावेळी त्याने 6 ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना बाद करत 4 सामन्यात एकूण 10 विकेट्स घेतल्या होत्या. यामुळे त्याला सामनावीर पुरस्कारही देण्यात आला होता.
-ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिरंगी मालिकेतील कामगिरीला पाहता, माजी क्रिकेटपटू मनोज प्रभाकर यांनी कुमारला जादूगर असे नाव दिले होते.
-2013च्या कॉर्पोरेट ट्रॉफी गेममध्ये कुमार ऑईल अँड नॅचरल गॅस लिमीचेट संघाचे प्रतिनिधित्व करत होता. यावेळी अजितेश अरगलला शाब्दिक वाद केल्यामुळे त्याच्यावरती सामना शुल्काच्या 100 टक्के दंड ठोठावण्यात आला होता. तसेच पुढील विजय हजारे ट्रॉफीसाठी त्याला निलंबीत केले होते.
मार्च 2013मध्ये त्याच्यावरील दंड कमी करत बीसीसीआयने त्याला देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची परवानगी दिली होती.
-2014मध्ये कुमारला औदासिन्यातून बाहेर काढत मुंबई इंडियन्ससह करार मिळवून देण्यात रोहित शर्माने त्याला मदत केली होती.
-कुमार हा भारताचे तत्वज्ञानी, शिक्षक, अर्थशास्त्रज्ञ आणि न्यायशास्त्रज्ञ चाणक्य यांना मानत असे. तो बऱ्याचदा बोलताना त्यांचे विचार किंवा वाक्ये वापरत असे.
-कुमारने 2010मध्ये सपना चौधरी हिच्याशी लग्न केले. त्यांना सारा कुमार ही मुलगी आहे.
-कुमारला भविष्यात गोलंदाजी प्रशिक्षक व्हायचे आहे.
-दुखापतीमुळे कुमारला आयसीसी विश्वचषक 2011 खेळण्याची संधी गमवावी लागली. तो याला त्याच्या कारकिर्दीतील सर्वात निराशादायी किस्सा समजतो.
-कुमार हा 8 लाखांची 250 ग्रॅमची सोन्याची साखळी घालतो. हा त्याची एक वेगळी ओळख आहे. 2016मध्ये नागपूरयेथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमध्ये त्याची ही साखळी चोरीला गेली होती.