संपुर्ण नाव- रविंद्रसिंह अनिरुद्धसिंह जडेजा
जन्मतारिख- 6 डिसेंबर, 1988
जन्मस्थळ- नवगम-खेड, सौराष्ट्र
मुख्य संघ- भारत, चेन्नई सुपर किंग्स, गुजरात लायन्स, भारत अ, इंडिया ब्ल्यू, इंडिया इमर्जिंग प्लेयर्स, इंडिया रेड, 19 वर्षांखालील भारतीय संघ, भारतीय बोर्ड अध्यक्षयी एकादश, कोची टस्कर्स केरळ, राजस्थान रॉयल्स, शेष भारतीय संघ, सौराष्ट्र, सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन एकादश आणि पश्चिम विभाग
फलंदाजीची शैली- डाव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 13 ते 17 डिसेंबर, 2012, ठिकाण – नागपूर
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध श्रीलंका , तारिख – 8 फेब्रुवारी, 2009, ठिकाण – कोलंबो
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध श्रीलंका , तारिख – 10 फेब्रुवारी, 2009, ठिकाण – कोलंबो
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 49, धावा- 1869, शतके- 1
गोलंदाजी- सामने- 49, विकेट्स- 213, सर्वोत्तम कामगिरी- 7/48
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 165, धावा- 2296, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 165, विकेट्स- 187, सर्वोत्तम कामगिरी- 5/36
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 49, धावा- 173, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 49, विकेट्स- 39, सर्वोत्तम कामगिरी- 3/48
थोडक्यात माहिती-
-रविंद्र जडेजाचे वडील अनिरुद्ध सिंग हे सेक्यूरिटा गार्ड होते. तर, आई लता या नर्स होत्या. जडेजाला रनजितसिंह आणि दुलिपसिंह हे भाऊ आहेत. त्याची बहीण नैना ही नर्स आहे.
-जडेजाच्या वडिलांची इच्छा होती की, त्याने आर्मी बनावे. त्याच्या वडिलांनी त्याला आर्मी शाळेतही टाकले होते. पण आई त्याला क्रिकेटसाठी पाठिंबा देत असायची.
-जडेजाच्या युवा वयातच त्याच्या आईचे निधन झाल्याने आपले स्वप्न पूर्ण होणार नसल्याचे त्याला वाटले. पण तसे झाले नाही.
-जडेजा हा त्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे ज्यांनी 2 19 वर्षांखालील विश्वचषक खेळले आहेत. 2006मध्ये 19 वर्षांखालील पाकिस्तान संघाने अंतिम सामन्यात 19 वर्षांखालील भारतीय संघाला पराभूत केले. तर, 2008मध्ये विराट कोहलीच्या 19 वर्षांखालील भारतीय संघाच्या विजयात जडेजाचेही योगदान होते.
-जडेजा आयपीेलच्या राजस्थान रॉयल्स संघात असताना शेन वॉर्नने त्याला ‘रॉकस्टार’ नाव दिले होते. तर, भारतीय संघसहकाऱ्यांनी त्याचे ‘जड्डू’ असे नाव ठेवले. तसेच सोशल मीडियावरती जास्त तर ‘सर’ या नावाचा वापर केला जातो.
-जडेजाकडे ऑडी ए4 ही कार आहे. तसेच त्याच्याकडे सुझुकी हयाबुसा ही कारही आहे. त्याच्या व्यतिरिक्त शिखर धवनकडेही सुझुकी हयाबुसा ही कार आहे.
-शिवाय जडेजाला घोडे पाळण्याची आवड आहे. त्याच्याकडे गंगा आणि केसर असे 2 घोडे आहेत. तो त्यांना जामनगरजवळील आपल्या फार्महाऊनमध्ये ठेवतो.
-क्रिकेटव्यतिरिक्त जडेजाहा बिजनेसमनही आहे. राजकोटमध्ये त्याचे जड्डूज फूड फिल्ड हे रेस्टॉरंट आहे.
-12 हा जडेजाचा लकी नंबर आहे. त्याच्या जर्सीचा क्रमांक 12 आहे. तसच त्याच्या राजकोटमधील रेस्टॉरंटचे उद्घाटनही त्याने 12-12-2012 ला केले. शिवाय भारतीय संघात त्याची निवड ही डिसेंबर महिन्यातच झाली होती.
-एप्रिल 2017मध्ये जडेजाने रिवा सोलंकीसह लग्न केले. तिने इंजिनिअरिंग केले आहे. तसेच लग्नाच्या दिवशी त्याच्या सासऱ्याने त्याला ऑडी क्यू7 कार भेट दिली.
-लग्नाच्या काही महिन्यानंतर जडेजाला गुजरात गिर जंगलप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे त्याला 20000 रुपये दंड आकारण्यात आला होता.
-2013मध्ये वनडे क्रमवारीत जडेजा हा अव्वल क्रमांकावर होता. अनिल कुंबळेनंतर तो पहिला क्रिकेटपटू जो गोलंदाजाच्या वनडे क्रमवारीत अव्वल क्रमांकावर पोहोचला होता.
-तसेच कपिल देव, महिंदर सिंग आणि कुंबळेनंतर वनडे क्रमवारीत अव्वल येणारा तो चौथा भारतीय गोलंदाज होता.
-शिवाय, 2017मध्ये तो कसोटी गोलंदाजी क्रमवारीतही अव्वल क्रमांकावर होता. तसेच तो अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या यादीतही अव्वल क्रमांकावर होता.