-2010च्या आयपीएल हंगामात यादवची दिल्ली डेअरडेविल्स संघात निवड झाली. यावेळी त्याने संपूर्ण हंगामात 7 सामन्यात अवघ्या 6 विकेट्स घेतल्या.

-नोव्हेंबर 2011मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध यादवने कसोटीत पदार्पण केले. तो विदर्भाकडून कसोटीत खेळणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला. तर, गंधे याने प्रथम श्रेणीत 340 विकेट्स घेऊनही त्याला संधी मिळाली नाही.

-यादवने त्याची फलंदाजी शैली प्रथम नोव्हेंबर 2011मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत दाखवली. यावेळी 7व्या क्रमांकावर खेळायला गेलेल्या यादवने वरून अरोरासोबत मिळून जिंकण्यासाठी आवश्यक असणाऱ्या 7 धावा केल्या.

-यादवच्या वेगवान गोलंदाजी शैलीला अनेक माजी क्रिकेटपटू प्रभावित झाले. झहीर खानने त्याला भारतीय संघात घेण्याची शिफारस केली. तर, गॅरी सोबर्स आणि ग्लेन मॅकग्रथ यांनी त्याच्या गोलंदाजीची प्रशंसा केली. शिवाय डेल स्टेन जे खुद्द जगातील सर्वात वेगवान गोलंदाज आहेत, ते यादवचे खूप मोठे चाहते आहेत.

-2015च्या आयसीसी विश्वचषकात यादवने 8 सामन्यात 17.83च्या सरासरीने 18 विकेट्स घेतल्या होत्या.

-यादवने 2017च्या ओडिसाविरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात 119 चेंडूत 128 धावा केल्या होत्या. यात त्याच्या 7 चौकारांचा आणि 7 षटकारांचा समावेश होता.

-2013मध्ये तानयाशी यादवने लग्न केले. ती फॅशन डिझायनर आहे. दोघेही आयपीएल सामन्यादरम्यान पहिल्यांदा भेटले होते.