पाकिस्तान क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकापेक्षा एक वेगवान गोलंदाज दिले आहेत. वसीम अकरम आणि वकार यूनिस यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःचा दहशत तयार केली होती. तर शोएब अख्तर याने विरोधी संघाच्या मनातील वेगवान गोलंदाजांची भीती अधिकच वाढवली. सध्याच्या पाकिस्तान संघाकडेही जबरदस्त वेगवान गोलंदाज आहेत. अशातच पाकिस्तान सुपर लीग 2023 मध्ये एक 20 वर्षीय वेगवान गोलंदाज चमकला. बुधवारी (15 फेब्रुवारी) मुलतान सुलतान्स आणि क्वेटा ग्लेडिएटर्स यांच्यातील सामन्यात इहसानुल्लाह याने पाच विकेट्स घेतल्या.
पाकिस्तान संघात सध्या शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह आणि मोहम्मद हसनैन हे वेगवान गोलंदाज आहे. या वेगावन गोलंदाजांच्या जोरावर पाकिस्तानने मागच्या काही वर्षात स्वतःचे प्रदर्शन चांगलेच सुधारले. पाकिस्तान सुपर लीग म्हणजेच पीएसएल 2023 च्या तिसऱ्या सामन्यात मुलतान सुलतान्स आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स संघ आमने सामने होते. मुलतान सुलतान्सचा युवा वेगवान गोलंदाज इहसानुल्लाह (Ihsanullah) याने या सामन्यात सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. इहसानुल्लाहच्या गतीपुढे क्वेट ग्लॅडिएटर्स संघाचा कर्णधार सरफराज खान अवघ्या 2 धावा करून विकेट गमावली. पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर त्याने सरफराजला क्लीन बोल्ड केले. त्याच्या स्पेलच्या दुसऱ्या षटकात जेसन रॉय बाद झाला. पुढच्याच चेंडूवर इफ्तिखार अहमद इहसानुल्लाहचा शिकार बनला. पाकिस्तानचा प्रमुख फलंदाज इफ्तिखार अहमद देखील इहसानुल्लाहच्या गतीचा अंदाज लावू शकला नाही.
𝐓𝐇𝐔𝐍𝐃𝐄𝐑𝐁𝐎𝐋𝐓𝐒 🚀
Ihsanullah is bowling with serious heat 🔥#HBLPSL8 | #SabSitarayHumaray | #MSvQG pic.twitter.com/TnLTbRgVeu
— PakistanSuperLeague (@thePSLt20) February 15, 2023
इहसानुल्लाहच्या तिसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर उमर अकमल विकेट गमावून बसला. या षटकातील चौथ्या चेंडूवर नसीम शाह देखी क्लीन बोल्ड झाला. नसीम शाहच्या विकेटसह इहसानुल्लाहाने या सामन्यातील स्वतःच्या 5 विकेट्स पूर्ण केल्या. इहसानुल्लाहचा हा केवळ 10 वा सामना होता आणि पहिल्यांदाच एका सामन्यात 5 विकेट्स घेण्याची कमाल केली आहे. पीएलएल 2023 च्या पहिल्या सामन्यात त्याने दोन विकेट्स घेतल्या होत्या.
Ihsanullah clocked at 150.3 kph for the delivery that dismissed Sarfaraz Ahmed #PSL8 #QGvMS pic.twitter.com/FY0KrdyRL9
— Saj Sadiq (@SajSadiqCricket) February 15, 2023
चार षटकांच्या आपल्या स्पेलमध्ये इहसानुल्लाहने 12 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या. यामध्ये एक षटक निर्धाव टाकले आणि 150 किमी ताशी गतीने चेंडूही टाकला. इहसानुल्लाहच्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर मुलतान संघाने क्वेटला अवघ्या 110 धावांवर सर्वबाद केले. प्रत्युत्तरात 13.3 षटकात आणि 1 विकेटच्या नुकसानावर विजय मिळवला.(PSL 2023 Pakistan’s young fast bowler Ihsanullah took a five-wicket haul for Multan Sultans)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
डोमेस्टिक क्रिकेटचा ‘बादशहा’ वसीम जाफरच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
भारतीय चाहत्यांच्या आनंदावर विरजण! काही तासातच नंबर वनवरून खिसकली टीम इंडिया, ऑस्ट्रेलिया टॉपला