नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने (नाडा) नॅशनल रजिस्टर्ड टेस्टिंग पूल (एनआरटीपी) मध्ये समाविष्ट असलेल्या पाच भारतीय क्रिकेटपटूंना प्रथमच नोटीस पाठवण्यात आली आहे.
यामध्ये चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara), रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja), केएल राहुल (KL Rahul) यांच्यासह दोन महिला क्रिकेटपटू स्मृती मंधना (Smriti Mandhana) आणि दीप्ती शर्मा (Deepti Sharma) यांचा समावेश आहे.
या सर्वांनी गेल्या तीन महिन्यांतील डोपिंग एजन्सीला ते कोठे राहतात. व्हेअर अबाउट क्लॉज (राहण्याची जागा) या कलमांतर्गत माहिती दिली नाही. बीसीसीआयने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे, की संकेतशब्द त्रुटीमुळे खेळाडू माहिती पाठवू शकले नाहीत.
नाडाचे महासंचालक नवीन अगरवाल (Navin Agarwal) यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले, की एनआरटीपीमध्ये सामील असलेल्या ५ खेळाडूंनी माहिती दिली नाही. त्यावर बीसीसीआयने ई-मेल पाठवून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
“अँटी डोपिंग प्रशासन आणि मॅनेजमेंट सिस्टम (एडीएएमएस) सॉफ्टवेअरमध्ये व्हेअर अबाउट फॉर्म भरण्यासाठी केवळ दोन मार्ग आहेत. स्वत: खेळाडू किंवा बोर्ड त्यांच्या वतीने हा फॉर्म ऑनलाइन भरू शकतात. काही ऍथलीट्स इतके हुशार नसतात किंवा स्वत:च क्लॉजबद्दल संबंधित सर्व माहिती अपलोड करण्यासाठी त्यांच्याकडे इंटरनेट सुविधा नसतात. अशा परिस्थितीत त्यांना संबंधित बोर्डाची मदत घ्यावी लागते,” असे डीजी अगरवाल म्हणाले.
“बहुतेक क्रिकेटपटू सुशिक्षित असतात. आणि त्यांना तंत्रज्ञानाची माहिती असते. असे असूनही त्यांना माहिती न देण्याचे एक कारण म्हणजे त्यांचं व्यस्त राहणं असू शकते. अशा परिस्थितीत बोर्डाने त्यांचे व्हेअर अबाउट फॉर्म भरायला हवे होते,” असे ते पुढे म्हणाले.
बोर्डाने या खेळाडूंविषयी माहिती का अपलोड केली नाही? यावर नाडाचे डीजी म्हणाले की, बीसीसीआयने आपले स्पष्टीकरण पाठविले आहे. जे आम्हाला सध्या योग्य वाटत आहे. यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, की हे व्हेअर अबाउट क्लॉज याचं उल्लंघन आहे की नाही?
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये बीसीसीआय नाडाच्या अंतर्गत आलं आहे. यापूर्वी भारतीय बोर्ड स्वीडनस्थित आंतरराष्ट्रीय डोप टेस्टिंग मॅनेजमेंट (आयडीटीएम) च्या मदतीने क्रिकेटपटूंचे नमुने घेत होती. आणि नंतर ते राष्ट्रीय डोप टेस्टिंग प्रयोगशाळेत पाठवत असे. पण क्रीडा मंत्रालय यावर बर्याच काळापासून आक्षेप घेत होते.
बोर्डाने प्रदीर्घ वादानंतर नाडाच्या अधीन येण्याचे मान्य केले. आरटीपीमध्ये सहभागी असलेल्या खेळाडूंना ते कोठे राहतात याबद्दल माहिती देणे आवश्यक असते. खेळाडूंना वर्षातून ४ वेळा व्हेअर अबाउट क्लॉज भरावा लागतो.
बीसीसीआयच्या (BCCI) क्रिकेट ऑपरेशनशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी क्रिकेटपटूंबद्दलची माहिती नाडाकडे न पाठवल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. लॉकडाऊनमुळे सर्व खेळाडू घरीच आहेत, असे ते म्हणाले. त्यातील काही जण तर इंस्टाग्रामवर थेट चॅटसह पॉडकास्ट देखील करत होते.
जर संकेतशब्द ठीक करण्यास बोर्डला अडचण येत होती. तर या पाच खेळाडूंना थेट माहिती भरण्यास सांगितले जाऊ शकत होते आणि एखाद्याच्या मदतीने ते काम पूर्ण करू शकले असते. ते म्हणाले, की कदाचित नाडा या वेळी शांततेत घेईल. पण जर हा अधिकृत इशारा झाला, तर त्याला जबाबदार कोण असेल?, असेही ते म्हणाले.
ट्रेंडिंग घडामोडी-
-लवकरच तयार होणार १९ पीचवालं देशातील पहिलं मैदान, महाराष्ट्रातील लाल मातीचा केलाय खास उपयोग
-गंभीर म्हणतो; ती गोष्ट मिळवली नाही तर कोहलीची कारकिर्द अधुरीच
-तुम्ही त्याला वाईट म्हणून तुमच्यातील जळकी वृत्ती दाखवून दिली