पुणे। पुणे विमाननगर येथील सिंम्बॉयसिस क्रीडांगणावर सुरू असलेल्या पुणे महानगर पालिका आयोजित महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने मुख्य संयोजक क्रीडा समितीचे अध्यक्ष राहूल भंडारी यांनी आयोजित केलेल्या पुणे महापौर चषक कबड्डी स्पर्धेच्या चौथ्या दिवशी पुरूष विभागात उपउपांत्य फेरीच्या सामन्यात शाहू सडोली कोल्हापूर संघाने दसपटी रत्नागिरी संघावर 36-26 असा विजय मिळवून उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
मध्यंतराला शाहू सडोली संघाकडे 17-11 अशी आघाडी होती. शाहू सडोलीच्या तानाजी चव्हाण याने चौफेर चढाया करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्याला विवेक भोईटे याने उत्कृष्ट पकडी घेऊन चांगली साथ दिली. दसपटी रत्नागिरी संघाच्या शेखर लाटके व कृष्णा सपकाळे यांनी चांगला प्रतिकार केला.
नंदुरबारच्या एनटीबीसी संघाने नासिकच्या क्रीडा प्रबोधिनी संघावर 44-28 असा विजय मिळविला. मध्यंतराला एनटीबीसी संघाकडे 23-15 अशी आघाडी होती. एनटीबीसी संघाच्या दादा आढाव व ऋषिकेश बनकर याने चौफेर चढाया करीत हल्ला चढवित आक्रमक खेळ केला. त्यांच्या निखील शिंदे यांने चांगल्या पकडी घेतल्या. क्रीडा प्रबोधिनी संघाच्या करण जवरे व राकेश खैरनार यांनी चांगली लढत दिली. हिमांश शिरसाठ याने चांगल्या पकडी घेतल्या.
नवभारत कबड्डी कोल्हापूर संघाने गुडमॉर्निंग मुंबई शहर संघावर 39-22 अशी मात करीत उपात्यपूर्व फेरीत प्रवेश केला. नवभारत संघाच्या आनंद पाटील याने खोलवर चढाया करीत आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याला सचिन पाटील याने उत्कृष्ट पकडी चांगली साथ दिली. गुडमॉर्निंग मुंबई शहर संघाच्या सुदेश कुळे यांने चांगल्या चढाया केल्या व अजय शिंदे याने चांगल्या पकडी घेतल्या.
महिला विभागात नासिकच्या क्रीडा प्रबोधिनी संघाने धर्मवीर संघावर 32-25 असा विजय मिळविला. मध्यंतराला क्रीडा प्रबोधिनी संघाकडे 19-12 अशी आघाडी होती. क्रीडा प्रबोधिनीच्या मालती गांगुर्डे व ज्योती पवार यांनी चौफेर चढाया करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्यांना वासंती पवार हिने चांगल्या पकडी घेत मोलाचे सहकार्य केले. धर्मवीर बालेवाडी संघाच्या समृध्दी कोळेकर हिने चांगल्या चढाया करीत चांगला प्रतिकार केला व संगीता येनपूरे हिने उत्कृष्ट पकडी घेतल्या. अत्यंत अटितटीच्या झालेल्या उपउपात्य फेरीच्या सामन्यात एमएच स्पोर्टस् संघाने राजा शिवछत्रपती संघावर 28-26 असा निसटता विजय मिळविला.
मध्यंतराला एमएच स्पोर्टस् संघाकडे 19-12 अशी आघाडी होती. एमएच स्पोर्टस् संघाच्या प्रतिक्षा कऱ्हेकर हिने उत्कृष्ट खेळ करीत विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. तीला चैत्राली कारके हिने उत्कृष्ट पकडी घेत मोलाची साथ दिली. राजा शिवछत्रपती संघाच्या सिध्दी पोळ व मानसी रोडे हिने चांगला प्रतिकार केला. त्यांना सिध्दी मराठे हिने पकडी घेत चांगली साथ दिली.
उपउपांत्यपूर्व फेरीचे झालेले इतर सामने-
पुरूष विभाग-
राणा प्रताप वि.वि. नुमवि(43-29),
बंड्या मारूती वि.वि. छावा संघ(41-11)
महिला विभाग-
राजमाता जिजाऊ वि.वि. अनिकेत संघ खेड(30-11),
हनुमान संघ बाचणी वि.वि. स्वराज्य संघ उपनगर(35- 19),
सुवर्णयुग वि.वि. द्रोणा स्पोर्टस्(50-22),
महेशदादा फाऊंडेशन वि.वि. आकांक्षा कला क्रीडा(45-21),