‘राजाराम भिकू पठारे स्टेडियम’ खराडी, पुणे येथे अजपासून सुरू झालेल्या क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज – आंतर जिल्हा युवा लीग मध्ये यजमान पुणे पलानी टास्कर्स संघांने कोल्हापूर ताडोबा टायगर्स संघावर विजय मिळवत विजयी सलामी दिली. दोन्ही संघांनी सुरुवातीला सावध सुरुवात केली. त्यानंतर पुणे पलानी टास्कर्सच्या आर्यन राठोडने चढाईत २ गुण मिळवत पुणे संघाचा खाता उघडलं. पृथ्वीराज शिंदे व हर्षद माने यांच्या जबरदस्त पकडीमुळे कोल्हापूर ताडोबा टायगर्सवर सुरुवातीलाच लोन पडला.
पुणे पलानी टास्कर्सकडे १५ मिनिटापर्यत १२-५ अश्या आघाडी होती. त्यानंतर कोल्हापूर ताडोबा टायगर्सच्या तेजस पाटीलने सलग चढाया करत गुण मिळवत पुणे संघाची आघाडी कमी केली. मध्यांतरापर्यत १६-१५ असा चुरशीचा खेळ झाला. मध्यांतरानंतर कोल्हापूरच्या तेजस पाटील चढाईत तर ओमकार पाटीलने पकडीत गुण मिळवत पुणे संघाला पुन्हा ऑल आऊट केले. चुरशीच्या झालेल्या यासामन्यांत शेवटच्या चढाईत पुणेच्या भूषण तपकीरने चढाईत गुण मिळवत आपल्याला संघाला ३०-२९ असा विजय मिळवून दिला. पुणेच्या भूषण तपकीर ने ४ बोनस गुणांच्या सह चढाईत ८ गुण मिळवले. कोल्हापूरकडून तेजस पाटीलने सर्वाधिक ८ गुणांची कमाई केली. पुणेच्या हर्षद मानेने ४ पकडी तर पृथ्वीराज शिंदेने ३ पकडीत गुण मिळवले.
● बेस्ट रेडर- तेजस पाटील, कोल्हापूर ताडोबा टायगर्स
● बेस्ट डिफेंडर- हर्षद माने, पुणे पलानी टास्कर्स
● कबड्डी का कमाल- भूषण तपकीर, पुणे पलानी टास्कर्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिकव्हर होत असलेल्या पंतबाबत मोठी बातमी! IPL 2023 सुरू होण्यापूर्वीच म्हणाला, ‘मी खेळायला येतोय…’
धोनीच्या नेतृत्वावर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्मिथही फिदा; म्हणाला, ‘ही’ कला त्याच्याकडून शिकलोय