आयपीएल 2023 मध्ये शनिवारी दुसरा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स असा खेळला गेला. मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात फलंदाजांनी अक्षरशः धावांचा पाऊस पाडला. कर्णधार सॅम करनच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर पंजाबने 8 बाद 214 अशी मोठी मजल मारली. पंजाबच्या फलंदाजांनी डेथ ओव्हर्समध्ये तुफानी फटकेबाजी करताना मुंबईच्या गोलंदाजांना चांगला चोप दिला.
प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाल्यानंतर पंजाबला आघाडीच्या फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारून दिली. त्यानंतर मात्र पंजाबची फलंदाजी घसरली. संघाचा हा डाव कर्णधार सॅम करन व हरप्रित भाटिया यांनी सावरला. पंजाबचा फलंदाजांनी अखेरच्या सहा षटकांमध्ये मुंबईच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी या सहा षटकांमध्ये तब्बल 109 धावा कुटल्या. आपला तिसरा सामना खेळत असलेल्या अर्जुन तेंडुलकर याच्या एकाच षटकात तब्बल 31 धावा करन व भाटिया ही जोडी काढण्यात यशस्वी ठरली.
या सर्वांमध्ये करन याचे 17 चेंडूत 47 धावांचे योगदान होते. त्याचबरोबर भाटियाने 12 चेंडूंमध्ये 26 धावा केल्या. भाटिया बाद झाल्यानंतर उतरलेल्या जितेश शर्माने 7 चेंडूत 27 धावा झोडल्या. सोबतच हरप्रीत ब्रारने 2 चेंडूवर 5 धावा केल्या.
पंजाबने त्याच बरोबर अखेरच्या पाच षटकांमध्ये 96 धावा केल्या. ही आयपीएल इतिहासातील अखेरच्या पाच षटकातील दुसरी सर्वात मोठी धावसंख्या आहे. पाच षटकात आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या करण्याचा मान रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या विराट कोहली व एबी डिव्हिलियर्स यांना जातो. या दोघांनी 30 चेंडूवर 112 धावा केल्या होत्या.
(Punjab Kings Batters Hit 109 Runs In Last 6 Overs Against Mumbai Indians In IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुन्हा आरसीबी दिसणार ‘ग्रीन जर्सी’मध्ये! सलग 13 व्या वर्षी जपणार सामाजिक बांधिलकी