---Advertisement---

पंजाब किंग्जचे २२ कोटी पाण्यात, ज्यांच्यावर बक्कळ पैसा ओतला; तेच आता संघावर बनलेत ओझं!

---Advertisement---

पहिल्या जेतेपदासाठी आसुसलेला पंजाब किंग्ज संघ आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी आपले सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करत आहे. गतवर्षी पंजाबच्या गोलंदाजांची कामगिरी अतिशय निराशादायी राहिली होती. त्यामुळे आयपीएल २०२१ लिलावात त्यांनी गोलंदाजांवर पाण्यासारखा पैसा ओतला. परंतु ज्यांच्यासाठी त्यांनी कोटींमध्ये पैसा खर्च केला, तेच गोलंदाज सध्या अतिशय खराब प्रदर्शन आहेत. त्यांच्या नकोशा कामगिरीमुळे त्यांना अंतिम ११ तून बाहेर करण्याची संघनायकावर वेळ आली आहे. हे गोलंदाज म्हणजे, रिले मेरेडिथ आणि झाय रिचर्डसन.

पंजाब किंग्जचे २२ कोटी पाण्यात!
पंजाबचे प्रशिक्षक अनिल कुंबले यांनी संघ व्यवस्थापकांशी झालेल्या चर्चेनंतर रिले मेरेडिथ आणि झाय रिचर्डसन यांना आपल्या ताफ्यात घेण्याचे ठरवले होते. त्यासाठी त्यांनी तब्बल २२ कोटी खर्च केले होते. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मेरेडिथला पंजाबने ८ कोटींना विकत घेतले होते. तर ऑस्ट्रेलियाचा गोलंदाजी अष्टपैलू रिचर्डसनला त्यांनी १४ कोटींची बोली लावत आपल्या संघात सामील केले होते.

आतापर्यंतची कामगिरी राहिलीय सरासरी
मेरेडिथला राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पंजाबच्या हंगामातील पहिल्याच सामन्यात संधी देण्यात आली होती. या सामन्याद्वारे त्याने आपले आयपीएल पदार्पणही केले होते. परंतु या सामन्यात ४ षटके गोलंदाजी करताना ४९ धावा देत त्याने फक्त १ विकेट घेतली. तरीही पुढील २ सामन्यात त्याला अंतिम ११ जणांमध्ये निवडण्यात आले होते. या सामन्यातही विरोधी संघाच्या फलंदाजांनी त्याला चोप चोपले. त्यामुळे अखेर त्याला बाकावर बसवावे लागले.

आतापर्यंत पंजाबकडून ३ सामने खेळताना मेरेडिथने तब्बल १०५ धावा देत फक्त २ विकेट आपल्या खात्यात नोंदवल्या आहेत. दरम्यान त्याचा इकोनॉमी रेट १०.५ इतका राहिला आहे.

दुसरीकडे वेगवान गोलंदाज रिचर्डसनलाही खास कामगिरी करता आलेली नाही. त्यानेही पंजाबच्या हंगामातील पहिल्याच सामन्यातून आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली होती. दरम्यान १०.६४ च्या इकोनॉमी रेटने ११७ धावांवर तो फक्त ३ विकेट्स घेऊ शकला आहे.

पंजाब किंग्जचा हंगामातील सहावा सामना आज (२६ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध होणार आहे. अशात हा सामना जिंकत २ गुणांची भर पाडत गुणतालिकेत टॉप-४ मध्ये उडी घेण्याचा त्यांचा इरादा असेल. अशात जर मेरेडिथ किंवा रिचर्डसनला अंतिम पथकात जागा दिली गेली, तर हे गोलंदाज संघाच्या अपेक्षांवर खरे उतरतील का नाही?, हे पाहावे लागेल.

महत्त्वाच्या बातम्या-

रजनी सर म्हातारे होत आहेत, म्हणून देवाने सर जडेजाला बनवलं; सर्वत्र रंगली माहीच्या ‘त्या’ ट्विटची चर्चा

व्वा! यष्टीचा निशाणा हुकला आणि चेंडू अंपायरला लागला, मग काय रिषभने मोठ्या मनाने मागितली माफी

Video: चिडका पृथ्वी शॉ! धावबाद झाल्यानंतर पंतवर संतापला, डगआउटमध्ये केलं असं काही

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---