आयपीएल 2021 मधील पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स या सामन्यात पंजाबचा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईने खूप शानदार गोलंदाजी प्रदर्शन केले. त्यामुळे सर्वांनी त्याचे तोंडभरून कौतुक केले. परंतु याअगोदर पंजाब संघाचे चार सामने झाले होते. या चारही सामन्यात रवी बिश्नोईला का संघाबाहेर ठेवण्यात आले होते? असे प्रश्न उपस्थित केले जात होते. आता याबाबत पंजाब संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी वक्तव्य केले आहे.
शुक्रवारी (23 एप्रिल) रोजी एमए चिंदबरम स्टेडीयमवर मुंबईविरुद्ध झालेल्या सामन्यात 20 वर्षीय युवा गोलंदाज रवी बिश्नोईने शानदार गोलंदाजी करत 4 षटकांत 21 धावा देऊन मुंबई संघातील दोन महत्वपूर्ण फलंदाजांचे बळी घेतले. यामध्ये त्याने सुर्यकुमार यादव आणि इशान किशनला बाद करत मुंबईच्या संघाला 131 धावांत रोखण्यात मोलाची कामगिरी बजावली. त्याने केलेल्या या कामगिरीबाबत त्याच्या संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे तसेच कर्णधार केएल राहुल यांनी त्याचे भरभरून कौतुक केले आहे.
परंतु सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये त्याला संघाबाहेर ठेवण्याबाबत बोलताना अनिल कुंबळे म्हणाले की, “रवी हा मागील आयपीएल हंगामापासून आमच्यासोबत खेळत आहे. परंतु यावर्षी जेव्हा तो आमच्या ताफ्यात सामील झाला, तेव्हा मला त्याने मागच्यावर्षी केली होती तशी गोलंदाजी जाणवली नाही. त्यामुळे मी त्याच्या रन-अपवर आणि अन्य काही गोष्टींवरती लक्ष घातले. या कारणामुळे तो सुरुवातीचे काही सामने खेळू शकला नाही.”
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, “मला मागच्या आठवड्यापासून त्याच्यात सुधार झाल्याचे दिसले असून तो आता पुन्हा आपल्या जुन्या गोलंदाजी शैलीत परतला आहे. त्याला या आपल्या जुन्या शैलीत परतल्याचे पाहून खूप आनंद होत आहे. त्याने चांगली कामगिरी करण्यास सुरूवात देखील केली असल्याचे आपण पाहिलेच आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
,रिषभ पंतचं हृदय चोरणारी सौंदर्यवती आहे तरी कोण? जिच्या एका फोटोचेही आहेत लाखो दिवाने
टीम इंडियाला शोधावा लागणार नवा फिनिशर? दिनेश कार्तिकच्या खराब आकडेवारीने वाढली संघाची काळजी
रोहित-मॉर्गनला १२ लाखांचा दंड झाल्याने इंग्लिश दिग्गज भलताच खुश; म्हणे, ‘खेल से खिलवाड नहीं’






