आयपीएल 2023 मध्ये पंजाब किंग्स संघाची कामगिरी संमिश्र होताना दिसत आहे. पंजाबने आतापर्यंत दहा सामने खेळताना पाच गमावले असून, पाच सामन्यात त्यांना विजय मिळाला आहे. पंजाबच्या यशात यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्मा याचे महत्त्वाचे योगदान राहिले. जितेश सातत्याने वेगवान फलंदाजी करत पंजाबला मोठी धावसंख्या उभारून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतोय. त्याच्या या कामगिरीबद्दल आता संघाचे सहाय्यक प्रशिक्षक ब्रॅड हॅडिन यांनी महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे.
मागील वर्षी जितेश याने आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे मन जिंकले होते. त्याने या हंगामात संघासाठी सर्वात निर्णायक भूमिका बजावली. त्याने जवळपास प्रत्येक सामन्यात आपल्या आक्रमक खेळाने पंजाबला मोठी धावसंख्या उभारून दिली. त्याच्या याच कामगिरीबाबत बोलताना ब्रॅड हॅडिन म्हणाले,
“जितेशने जबाबदारी घेऊन खेळ दाखवला आहे. तो अशा पद्धतीने आक्रमण करत असला तरी त्याला बाद होण्याची भीती नसते. त्याने स्वतःला तयार केले असून, जशी स्पर्धा पुढे जात आहे तसा त्याचा आत्मविश्वास वाढलेला दिसतो. त्याला कमी चेंडू खेळण्याची संधी मिळते त्यामध्ये तो प्रभाव पाडतो. मुंबईविरुद्ध आम्ही त्याला अधिकाधिक चेंडू खेळवले. तो यात देखील यशस्वी ठरला.”
जितेश याने मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात केवळ 27 चेंडूचा सामना करताना 5 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 49 धावा केल्या होत्या. त्याने आत्तापर्यंत आयपीएल 2023 मध्ये 10 सामने खेळताना 26.56 च्या सरासरीने 239 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट तब्बल 165 पेक्षा जास्त राहिला आहे. तसेच त्याच्या बॅटमधून 16 षटकारही आले आहेत.
(Punjab Kings Coach Brad Haddin Tell Secreat Of Jitesh Sharma Batting In IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BREAKING: केएल राहुल आयपीएलसह WTC फायनलमधून बाहेर! इंस्टा पोस्ट करत स्वतः दिली माहिती
भुवीने बॅट घेतली की सनरायझर्सचा पराभव फिक्स! आकडेवारी पाहून घालाल तोंडात बोटे