प्रियांश आर्यने पंजाब किंग्जकडून खेळताना आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याने गुजरात टायटन्सविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात 47 धावांची दमदार खेळी केली. प्रियांश दिल्ली प्रीमियर लीगमध्ये एका षटकात 6 षटकार मारल्यानंतर चर्चेत आला होता. प्रियांशने 23 चेंडूत 47 धावांची खेळी केली. या शानदार सुरुवातीमुळे पंजाब किंग्जने 243 धावांचा मोठा स्कोर उभारला.
गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाब किंग्जसाठी प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन यांनी डावाची सुरुवात केली, दोघांनी पहिल्या विकेटसाठी 28 धावांची भागीदारी केली. त्यानंतर त्याने कर्णधार अय्यरसोबत 51 धावांची भागीदारी केली. प्रियांशने आपल्या आयपीएल पदार्पणाच्या सामन्यात 47 धावा केल्या.
प्रियांश आर्यचा आयपीएल लिलावात बेस प्राइस 30 लाख रुपये होता, पण दिल्ली प्रीमियर लीगमध्ये केलेल्या दमदार कामगिरीनंतर अनेक संघांनी त्याच्यासाठी बोली लावली. शेवटी, पंजाब किंग्जने प्रियांश आर्यला 3.8 कोटी रुपयांना विकत घेतले.
प्रियांश आर्यने गेल्या वर्षी झालेल्या दिल्ली प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वात एका षटकात 6 षटकार मारले होते. साउथ दिल्ली सुपरस्टार्जसाठी खेळणाऱ्या प्रियांशने नॉर्थ दिल्ली स्ट्रायकर्सविरुद्ध ही कामगिरी केली होती.
आयपीएलमध्ये पदार्पण केलेल्या प्रियांश आर्यने एकूण 18 टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 573 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 102 धावा आहे. एका शतकाव्यतिरिक्त, त्याने 3 अर्धशतकेही झळकावली आहेत. यामध्ये त्याच्या नावावर 36 षटकार आणि 54 चौकार आहेत. याशिवाय प्रियांश आर्यने लिस्ट ए मध्ये 7 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 77 धावा केल्या आहेत.
243 धावांचा स्कोअर पंजाब किंग्जचा आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात मोठा एकूण स्कोअर आहे. PBKS संघाचा सर्वात मोठा स्कोअर 262/2 आहे, जो संघाने 26 एप्रिल 2024 रोजी ईडन गार्डन्स स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध केला होता.






