आयपीएल 2025 पूर्वी होणाऱ्या मेगा लिलावाबाबत चाहत्यांमध्ये आतापासूनच उत्सुकता आहे. संघ कोणत्या निवडक खेळाडूंना रिटेन करतील आणि कोणते खेळाडू मेगा लिलावात उतरतील, हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. अद्याप खेळाडूंना रिटेन करण्याबाबत बीसीसीआयकडून कोणतीही गाइडलाईन जारी करण्यात आलेली नाही. अशा स्थितीत एका संघाला कदाचित 5 खेळाडूंना रिटेन करता येईल, असं मानलं जात आहे.
दरम्यान, पंजाब किंग्ज फ्रँचायझीबद्दल एक विशेष दावा केला जात आहे. चाहते म्हणत आहेत की या संघानं आपल्या सोशल मीडिया पोस्टरद्वारे कोणत्या 5 खेळाडूंना संघात कायम ठेवणार, याबाबत इशारा दिलाय.
वास्तविक, पंजाब किंग्जनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कव्हर म्हणून एक खास चित्र वापरलं. या पोस्टरमध्ये सॅम करन, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, शशांक सिंग आणि कागिसो रबाडा या 5 खेळाडूंचा समावेश आहे. फ्रँचायझीनं याबाबत अद्याप काहीही सांगितलं नसलं तरी, चाहते याचा संबंध मेगा लिलावापूर्वी रिटेन करण्यात येणाऱ्या खेळाडूंशी जोडत आहेत.
Punjab Kings Just Leaked The No. of Retentions 😳 Is That Gonna be 5 ? pic.twitter.com/cmUqHNisPy
— 🤍✍ (@imAnthoni_) August 25, 2024
आयपीएल 2024 मध्ये पंजाब किंग्जची कामगिरी काही खास राहिली नव्हती. संघ मोठ्या अपेक्षेनं स्पर्धेत उतरला होता, मात्र ते प्लेऑफमध्ये पोहचण्यात अपयशी ठरले. पंजाब किंग्जची टीम आयपीएल 2024 मध्ये नवव्या स्थानावर राहिली. पहिल्या काही सामन्यांनंतर नियमित कर्णधार शिखर धवन दुखापतग्रस्त झाला, ज्यानंतर सॅम करननं कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली. मात्र संघ आपल्या कामगिरीत सातत्य राखू शकला नाही. पंजाब किंग्जनं आयपीएल 2024 मध्ये 14 पैकी फक्त 5 सामने जिंकले होते.
आयपीएल 2025 पूर्वी संघासोबतच पंजाब किंग्जच्या कोचिंग स्टाफमध्ये देखील बदल होणार आहेत. मुख्य प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांनी पंजाबची साथ सोडली असून फ्रँचाईझी त्यांच्याजागी एखाद्या भारतीय प्रशिक्षकाच्या शोधात आहे.
हेही वाचा –
संघ मालकांकडून होत असलेल्या चुकांवर केएल राहुलचं बेधडक वक्तव्य! म्हणाला, “प्रत्येक खेळाडू…”
अनेक गोलंदाजांचे आकडे तिसऱ्या क्रमांकावरील बाबर आझम पेक्षा चांगले, आईसीसी रँकिंगवर विश्वास तरी कसा ठेवायचा?
पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीला राग अनावर, संघाला कानपिचक्या देत म्हणाला…