---Advertisement---

“… म्हणून मला आरसीबीने रिटेन केले नाही”, स्वतः हर्षल पटेलने पुढे येत सांगितले कारण

harshal-patel
---Advertisement---

भारताचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल (harshal patel) याने आयपीएल (IPL) २०२१ मध्ये सर्वात जास्त विकेट्स घेतल्या. यासाठी त्याला पर्पल कॅपने सन्मानित देखील करण्यात आले. या उत्कृष्ट प्रदर्शनानंतर त्याचा संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हर्षलला पुढच्या हंगामासाठी रिटेन करेल, असा अनेकांचा अंदाज होता. परंतु, तसे झाले नाही. आरसीबीने हर्षल पटेलला रिटेन न केल्यामुळे अनेकांनी आश्चर्य देखील व्यक्त केले होते. आता हर्षल पटेलने स्वतः त्याला संघात रिटेन न करण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे.

आरसीबीने पुढच्या हंगामासाठी रिटेन केलेल्या खेलाडूंमध्ये विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज या तिघांची नावे आहेत. २०२१ हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा हर्षल पटेल, युवा सलामीवीर देवदत्त पडीक्कल आणि अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहल यांना मात्र आरसीबीने रिलीज केले. हर्षलने आयपीएल २०२१ मध्ये १५ सामने खेळले आणि यामध्ये सर्वाधिक ३२ विकेट्स नावावर केल्या.

आरसीबीने आपल्याला संघात का रिटेन केले नाही? याचे कारण स्वतः पटेलने दिले आहे. एका क्रिकेट संकेतस्थळाशी बोलताना हर्षल म्हणाला की, “आरसीबीने पुढच्या लिलावात जाण्यापूर्वी उपलब्ध रकमेचा ताळमेळ बसवण्याचा निर्णय घेतला आणि याच कारणास्तव मला रिटेन केले गेले नाही. जेव्हा मला रिटेन केले गेले नाही, तेव्हा मला आरसीबीचे डायरेक्टर ऑफ क्रिकेट माइक हेसन यांनी फोन केले आणि सांगितले की, उपलब्ध रकमेचे नियोजन करण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे.”

आरसीबीसोबत यापुढेही खेळायला आवडेल, असे हर्षल पुढे बोलताना म्हणाला. इतर कोणत्या संघाने संपर्क साधला आहे का? हे विचारल्यावर तो म्हणाला की, “माझ्याशी कोणीच संपर्क साथलेला नाहीये. आरसीबी मला त्यांच्यासोबत जोडू इच्छित असेल तर, मलादेखील या संघासाठी खेळायला आवडेल. कारण, आयपीएल २०२१ ने माझे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे.”

विराट कोहली आणि एबी डिविलियर्ससोबत ड्रेसिंग रूम शेअर करण्याविषयी प्रश्न विचारला गेल्यावर हर्षल म्हणाला की, इमानदारीने सांगायचे तर, ही माझ्यासाठी खुपच सामान्य गोष्ट होती. एवढेच नाही तर माझ्या पहिल्या आयपीएल हंगामात देखील मला असेच वाटले होते. ते ज्याप्रकारचे व्यक्ती आहेत आणि मैदानावर त्यांच्यामुळे जो फरक पडतो, मी त्याचा सन्मान करतो. ते ज्याप्रकारे मैदानावरील दबावाचे नियोजन करतात, ते कमाल आहे. मी देखील या दोन खेळाडूंकडून शिकलो आहे की, संघाला अडचणीतून बाहेर कसे काढले जाते.

महत्वाच्या बातम्या –

स्वर्गीय बल्लाळ चिपळूणकर क्रिकेट करंडक स्पर्धेत अमर इलेव्हन संघाची विजयी सलामी

‘हे’ दोन खेळाडू अजूनही राहाणार टीम इंडियात कायम, मुख्य प्रशिक्षक द्रविडचे संकेत

इमर्जन्सीमध्ये यष्टिरक्षणाला उतरला आणि केली विश्वविक्रमाची बरोबरी! ओली पोपचा कारनामा

व्हिडिओ पाहा –

टोकियो ऑलिम्पिक... भारतीय क्रीडाक्षेत्रात इतिहास घडवणारी स्पर्धा | India at Tokyo Olympics 2020

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---