भारतासाठी टोकियो ऑलिंपिकमधील आठवा दिवस (३० जुलै) खूपच मोठा आहे. कारण, बॉक्सिंगमध्ये लवलीना बोरगोहेनने भारतासाठी ऑलिंपिकमधील दुसरे पदक पक्के केले आहे. त्यानंतर आता महिला बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूनेही दमदार कामगिरी केली आहे.
टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये शुक्रवारी (३० जुलै) महिला बॅडमिंटनमध्ये भारत आणि जपान संघात उपांत्यपूर्व फेरीचा सामना पार पडला. यामध्ये जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने जपानच्या अकेन यामागुचीला २१-१३, २२-२० अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले आहे. हा सामना एकूण ५६ मिनिटे चालला. यासोबतच सिंधूने उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले आहे. तिच्या या शानदार कामगिरीमुळे भारताला बॅडमिंटनमध्ये टोकियो ऑलिंपिकचे पदक मिळण्याची आशा आहे. (PV Sindhu Beats Japan’s Akane Yamaguchi in the Women’s Singles Quarterfinal)
𝗢𝗡𝗘 𝗦𝗧𝗘𝗣 𝗖𝗟𝗢𝗦𝗘𝗥 😍
2016 Rio #Olympics 🥈 medalist @Pvsindhu1 beat local favourite 🇯🇵's Akane Yamaguchi 21-13, 22-20 in a thrilling Quarter final contest and enter the semi finals of @Tokyo2020 🔥#SmashfortheGlory#badminton#Tokyo2020#Cheer4India#TeamIndia pic.twitter.com/WYVOgDGXzY
— BAI Media (@BAI_Media) July 30, 2021
पहिल्या सेटमध्ये जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या अकेनने सिंधूविरुद्ध ६-४ अशी आघाडी घेतली होती. मात्र, काही वेळातच सिंधूने ६-६ अशी बरोबरी साधली. यानंतर सिंधूने जबरदस्त प्रदर्शन करत थेट ११- १८ अशी आघाडी घेतली. तसं पाहिलं तर अकेनही सिंधूला आव्हान देत होती. मात्र, सिंधूने आपल्या उत्कृष्ट खेळीने ५ गुणांची आघाडी घेत पहिला सेट २१-१५ ने जिंकला. पहिला सेट तब्बल २३ मिनिटे चालला.
यानंतर दुसऱ्या सेटमध्येही सिंधूचे पारडे जड होते. अकेन सामन्यात पुनरागमन करण्यासाठी प्रयत्न करत होती. मात्र, तिला सिंधूपुढे टिकाव लागला नाही. तिने सहजरीत्या दुसरा सेटही आपल्या नावावर केला. तिने २२-२० ने हा सेट जिंकला.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-