थायलंड ओपन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधुचा जपानच्या निओमी ओकुहाराने पराभव केला.
रविवारी (१५ जुलै) थायलंड ओपनच्या अंतिम सामन्यात ओकूहाराने सिंधुला २१-१५, २१-१८ अशा सरळ सेटमध्ये पराभूत करत स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.
५० मिनिटे चाललेल्या अंतिम सामन्यात सिंधुला जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत ८ व्या स्थानी असलेल्या निओमी ओकूहाराकडून पराभव स्विकारावा लागला.
पीव्ही सिंधु थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत प्रथमच पोहचली होती.
पहिल्या सेटमध्ये सिंधुने प्रथम खाते उघडत चांगली सुरवात केली होती. मात्र त्यानंतर जपानच्या ओकूहाराने झटपट गुण घेत हा सेट २१-१५ असा आपल्या नावे केला.
तर सामन्यातील दुसरा सेट अत्यंत चुरशीचा झाला. यामध्ये हा सेट प्रथम ९-९ असा बरोबरीत आला. त्यानंतरही हा सेट १८-१८ अशा बरोबरीत असताना ओकूहाराने सलग गुण घेत पीव्ही सिंधुवर २१-१८ असा विजय मिळवत थायलंड ओपन २०१८ चे विजेतेपद मिळवले.
महत्त्वाच्या बातम्या-
-म्हणुन धोनी आहेत जगातील सर्वात हुशार क्रिकेटर…
-एक फूटबाॅलर ते विश्व विजेती- जाणुन घ्या हिमा दासचा थक्क करणारा प्रवास