टोकियो ऑलिंपिक्स २०२० मधील रविवारचा दिवस (३१ जुलै) भारतासाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण आज बॉक्सिंगमध्ये सतीश कुमार, बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधू आणि भारतीय पुरुष हॉकी संघाचे सामने आहेत. यातील बॉक्सिंगच्या सामन्यात सतीशला पराभूत व्हावे लागले. मात्र, असे असले तरीही एक आनंदाची बातमी आहे. बॅडमिंटनच्या कांस्य पदकाच्या सामन्यात भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं इतिहास रचला आहे. सिंधूने एकेरी गटात चीनच्या बिंगजियाओला २१- १३, २१-१२ अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले. या विजयामुळे सिंधूने कांस्यपदक आपल्या नावावर केले आहे. विशेष म्हणजे असा कारनामा करणारी ती दुसरीच भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी तिने रिओ ऑलिंपिकमध्ये रौप्य पदक आपल्या खिशात घातले होते
या सामन्यात पहिल्या सेटमध्ये सिंधूने सुरुवातीपासूनच दमदार प्रदर्शन केले. तिने सुरुवातीला ४-१ आघाडी घेतल्यानंतर पुन्हा एकदा ६-५ने बिंगजियाओला मागे टाकले. तसेच पुढे तिने बिंगजियाओला क्रॉस शॉट खेळत ११-८ ने पहिला हाफ आपल्या नावे केला. पुढे तिने अशीच दमदार खेळी करत पहिला सेट २१-१३ ने आपल्या नावावर केला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही सिंधूने दबदबा कायम राखला आणि हा सेट २१-१५ अशा फरकाने आपल्या खिशात घातला. (PV Sindhu Won Bronze Medal Match Against China He BingJiao)
History has been created as its a back to back Olympic medal for India's @Pvsindhu1. She wins the BRONZE against China's He Bing Jiao 21-13, 21-15 at #Tokyo2020 pic.twitter.com/Y5kYn6IuKb
— SAI Media (@Media_SAI) August 1, 2021
टोकियो २०२० ऑलिंपिक ६ ची मानांकित सिंधू आणि ८ वी मानांकित बिंगजियाओमध्ये आजचा सामना सोडला, तर आतापर्यंत एकूण १५ सामने झाले आहेत. यामध्ये चीनची बिंगजियाओ ९-६ ने पुढे आहे. मात्र, २०१९ मध्ये झालेल्या शेवटच्या सामन्यात सिंधूने बिंगजियाओला पराभूत करत जागतिक चॅम्पियनशीपचा अंतिम सामना जिंकला होता.
सिंधूपूर्वी कोणत्या भारतीय खेळाडूने जिंकले आहेत २ ऑलिंपिक पदकं?
विशेष म्हणजे यापूर्वी भारतीय कुस्तीपटू सुशील कुमारने ऑलिंपिकमध्ये दोन पदकं जिंकली होती. त्याने २००८ बीजिंग ऑलिंपिक्समध्ये ६६ किलो वजनी गटात फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक जिंकले होते. त्यानंतर चार वर्षांनी २०१२ लंडन ऑलिंपिक्समध्ये रौप्य पदक जिंकले होते.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
–सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर सिंधूला वडिलांचा पाठिंबा; म्हणाले, ‘पराभव विसरून…’
-भारताचा पहिला सुपर हेवीवेट बॉक्सर सतीश कुमार क्वार्टर फायनलमध्ये पराभूत; संपला ऑलिंपिकमधील प्रवास