क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज मध्ये क्वालीफायर 4 चा सामना प्रमोशन फेरीतील दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला कोल्हापूर ताडोबा टायगर्स संघ विरुद्ध क्वालीफायर 2 चा विजयी मुंबई शहर मौर्य मेवरीक्स संघ यांच्यात झाला. प्रमोशन फेरीत झालेल्या सामन्यात कोल्हापूर संघाने मुंबई शहर संघावर मात दिली होती. कोल्हापूर संघाच्या तेजस पाटील ने चपळ चढाया करत गुण मिळवत संघाला आघाडी मिळवून दिली. तर मुंबई शहर कडून शार्दूल पाटील ने गुण मिळवत सामन्या सुरुवातीला चुरशीचा केला होता.
सामना 7-6 असा कोल्हापूर संघाकडे असताना ओमकार नारायण पाटील ने सुपर रेड करत 10-6 अशी आघाडी मिळवून दिली त्यानंतर उर्वरित मुंबई शहर संघ ऑल आऊट होत 15-7 अशी आघाडी मिळवली. मध्यांतराला 17-10 अशी आघाडी कोल्हापूर संघाकडे होती. तीच आघाडी कायम ठेवत कोल्हापूर संघाने सामन्यावर पकड मजबूत केली. शेवटची दहा मिनिटं शिल्लक असताना पून्हा एकदा मुंबई शहर संघाला ऑल आऊट करत कोल्हापूर संघाने 27-14 अशी भक्कम आघाडी मिळवली होती.
शार्दूल पाटील ने केलेल्या सुपर रेड ने सामन्यात चुरस आणली होती. मात्र त्यांचे प्रयत्न संघाला विजय मिळवून देण्यात कमी पडले. कोल्हापूर संघाने 40-24 असा एकतर्फी विजय मिळवत सेमी फायनल मध्ये प्रवेश केला. कोल्हापूर कडून तेजस पाटील ने 9 गुण मिळवले तर ओमकार युवराज पाटील ने महत्वपूर्ण 8 गुण मिळवत संघाच्या विजयात मोलाची भूमिका निभावली. दादासो पुजारीने 3 पकडी केल्या. मुंबई शहर कडून शार्दूल पाटीलने 13 गुण मिळवले व हर्ष लाड ने 4 पकडी केल्या मात्र त्याना आपल्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. (Qualifier 4 – Kolhapur Tadoba Tigers became the second team to enter the semi-finals)
बेस्ट रेडर- शार्दूल पाटील, मुंबई शहर मौर्य मेवरीक्स
बेस्ट डिफेंडर- हर्ष लाड, मुंबई शहर मौर्य मेवरीक्स
कबड्डी का कमाल- ओमकार युवराज पाटील, कोल्हापूर ताडोबा टायगर्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL 2019मध्ये धोनीच्या मैदानावरील जाण्याविषयी माजी सहकाऱ्याची प्रतिक्रिया, म्हणाला, ‘त्याला पश्चाताप…’
क्वालीफायर 3 – अहमदनगर पेरियार पँथर्स संघाची सेमी फायनल मध्ये धडक