विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान साउथॅम्प्टन मध्ये रंगणार आहे. हा सामना झाल्यानंतर जुलै महिन्यात श्रीलंका संघाविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळवण्यात येणार आहे. तर ऑगस्ट महिन्यात इंग्लंड संघाविरुद्ध ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे.या दोन्ही मालिकांसाठी बीसीसीआयने दोन वेगळे संघ निवडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इंग्लंड दौऱ्यासाठी संघाची घोषणा झाली आहे. तर श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या संघाची घोषणा येत्या काही दिवसात करण्यात येणार आहे.अशातच बीसीसीआयने वरिष्ठ संघात असे काही खेळाडू पाठवले आहेत, ज्यांना श्रीलंका दौऱ्यावर ही पाठवता येऊ शकले असते. त्यामुळे बीसीसीआयने घेतलेल्या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
बीसीसीआयवर होतो आहे प्रश्नांचा वर्षाव
इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या वरिष्ठ संघात केएल राहुल,वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. या खेळाडूंना संघात देण्यात आल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातला भाग नाहीये की, हे खेळाडू वरिष्ठ संघात खेळू शकत नाही. परंतु त्यांना या दौऱ्यावर संघात खेळण्याची खूप कमी संधी मिळू शकते. या संघात रोहित शर्मा आणि शुबमन गिल चांगली कामगिरी करत आहेत. तर यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत देखील चांगल्याच फॉर्म मध्ये आहे. त्यामुळे केएल राहुलचे खेळणे कठीण दिसून येत आहे. तसेच तो दुखापतग्रस्त असल्यामुळे खेळण्याची शक्यता कमी आहे. तसेच आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांची जोडी असताना, वॉशिंग्टन सुंदरला स्थान मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. शार्दुलने गेल्या काही सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तरीदेखील या संघात मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि ईशांत शर्मा यांची तिकडी आहे. त्यामुळे शार्दुलला ही खेळण्याची खूप कमी संधी मिळू शकते.
खेळाडूंचे मनोबल तोडण्याचे काम करत आहे बीसीसीआय
वरिष्ठ खेळाडू संघात असताना केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर यांना बेंच वर बसून राहावे लागु शकते. बेंच वर बसून राहून खेळाडूंचे मनोबल तुटू शकते. जर बीसीसीआयला आधीच माहीत होते की,एकाच वेळी भारतीय संघाला दोन ठिकाणी मालिका खेळायची आहे. तर बीसीसीआयने त्या अनुषंगाने संघाची निवड करायला हवी होती. कारण येत्या काही महिन्यात टी -२० विश्वचषक स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेत हे तिघेही खेळाडू भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यावर होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेत त्यांना सराव करण्याची संधी मिळाली असती.
या दिग्गज खेळाडूला वगळण्यात आले
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार,याला इंग्लंड दौऱ्यासाठी जाणाऱ्या संघात स्थान देण्यात आले नाहीये. त्यामळे देखील अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. बीसीसीआयने तो फिट नसल्याचे म्हटले आहे. परंतु त्याचे नाव श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या संघात आहे. भुवनेश्वर कुमारला इंग्लडच्या खेळपट्टीवर गोलंदाजी करताना भरपूर फायदा मिळाला असता.
महत्त्वाच्या बातम्या –
कसोटी क्रमवारीत भारताने कायम राखले अव्वल स्थान, या संघांची झाली घसरण
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना अनिर्णित राहिला तर काय होणार? वाचा आयसीसीचा नियम
फिरकी गोलंदाज असून मार्नस लॅबुशेनने टाकला चक्क वेगवान बाउन्सर, पाहा भन्नाट व्हिडिओ






